आण्विक प्रक्रिया, वृत्तबद्ध काव्यांत व्यक्त करण्याचा हा प्रयास आहे! कदाचित मराठी साहित्यात प्रथमच होत असावा.
विरक्तक धडक प्रक्रिया-१-संकल्पना
https://nvgole.blogspot.com/2021/02/blog-post_20.html
https://www.facebook.com/narendra.gole.3/posts/3930094993700087
विरक्तक म्हणजे अणू अंतर्गत विरक्त कण ज्याला इंग्रजीत न्यूट्रॉन म्हणतात. तसेच मराठीत विदलन म्हणजे इंग्रजीत फिजन. सर्वात अवजड अणूंवर विरक्तक धडकवल्यास घडून येणारी आण्विक प्रक्रिया म्हणजेच विदलन. मात्र विरक्तक धडक प्रक्रियांत, विरक्तकाच्या ऊर्जेवर तसेच लक्ष्य अणुच्या स्थिती व अवस्थेवर अवलंबून पुढील सहा निरनिराळ्या प्रक्रिया घडून येत असतात.
६-विरक्तक-धडक-प्रक्रिया
परस्पर स्वभावांतरण (ट्रान्सम्युटेशन), अनावरण आणि उचल (स्ट्रिपिंग अँड पिक-अप), विदलन (फिजन), विखंडन (स्पॅलेशन), विदारण (फ्रॅगमेंटेशन) आणि विखुरण (स्कॅटरिंग).
या प्रक्रियांची वर्णने इथे काव्यात बांधण्याचा प्रयत्न केला आहे. काव्यात का? तर कमीत कमी शब्दांत सुबोध विवरण करण्याचा तोच एकमेव मार्ग आपल्या सांस्कृतिक परंपरेने आपल्याला दिलेला आहे. वर्णने ’शार्दूलविक्रीडित’ वृतात (अक्षरे-१९, यती-१२, ७) केलेली आहेत.
जेव्हा घात विरक्तका धडकुनी केंद्रा
अणूच्या घडे
तो र्हासा मग सोसतो निरनिराळ्या
प्रक्रियांनी सहा ।
सार्या त्या धडका इथेच बघु या होती
कधी कोणत्या
नावे ठेवत लोक ती ’विदलना’, व्याख्या
न या जाणता ॥
अर्वाचीन साहित्यात वैज्ञानिक व्याख्या
काव्यबद्ध करण्याचा हा प्रयास अनोखा तर आहेच, शिवाय अपार परितोषजनकही आहे. आपल्या
वर्तमानात खंडित झालेल्या, पूर्वापारच्या सनातन सृजन परंपरेचा पाईक ठरणारा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा