ए माझे संजीवनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ए माझे संजीवनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२००८-०५-०९

ए माझे संजीवनी

ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही
अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा
तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा

ते कटाक्ष, ती चपळाई अन, जी तुझ्यात असे, नसे कुठे
ती कला मनास मोहवी जी तुझ्यात असे, नसे कुठे
मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा

तू मधुर जे बोल बोलशी, हसून जराही सुंदरी
तर अजूनही स्पंदने, नशेत धुंद रंगती
ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा

नरेंद्र गोळे २००८०३१५