मध्यमवर्गीय, पापभिरू, शाकाहारी, सख्खा मित्र;
हजारो कोटी रुपये मूल्याच्या आस्थापनेचा संचालक होतो,
ही घटनाच असाधारण आहे. मात्र तसा तो झाला.
माझा सख्खा मित्र सुरेश हावरे, ’हावरे बिल्डर्स’चा संचालक झाला.
जगभरातील सुमारे दहा कोटी बेघरांना घर कसे मिळेल?
या विवंचनेत हल्ली तो स्वतःला गुंतवून घेत असतो.
आज त्याचा वाढदिवस.
त्यानिमित्ताने केलेले हे त्याचे गुणगान आणि अभिष्टचिंतन.
रुजवत महतीही चांगल्या वर्तनाची
मिळवत सकलांचे स्नेह राहे सदाची ।
फिरत फिरत पाहे देश तो कौतुकाने
सतत हृदयि राहे आपल्या कर्तबाने ॥१॥
नकळत शिरलेले दोष संस्थादिकांत
करत बदल साधे नेमके योग्य तेच ।
जनहित मनि राहे कार्य ते कोणतेही
कुणि न कधि दुखावा वागणे हो असेची ॥२॥
सुखवत स्वजनांना वैभवी ने सदाची
थकत न श्रम होता हातिच्या नेक कर्मी ।
कर्मठ दिनचर्या वाट चाले सुरेश
अनुसरत पतीला पाठ राखे कलत्र ॥३॥
सुख बरसत राहो राहु दे पूर्ण स्वास्थ्य
गुण मिरवत राहो पुत्रपौत्रादि सर्व ।
अनुसरु मग आम्ही मार्ग तोची सुखाचा
अवसर बघता हा आज आनंदण्याचा ॥४॥
नरेंद्र गोळे
२०२५०३०१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा