पपईच्या फांद्यांवर मारतांना उड्या
थांब थांब पाहू दे पिसारा जरा
क्षणात इथे होता, क्षणात तिथे कसा
जरा कुठे फांदीवर विसावे नव्या
बस जरा इथे, ध्यास नवा का हवा
टुणटुण इथेतिथे भराभरा उडे
थांब उडू नको, जरा नजर ठरू दे
कसा आहेस? ठीक ना?
विचारायच्या आत, भुरकन उडाला
गेला आकाशात!
नरेंद्र गोळे २०२११११०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा