श्री. जयवंत कोंडविलकर, सचिव पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, हे १९७१ साली भैय्याजी काणे गुरूजींसोबत मणिपूरला गेले, तिथेच मैतेयी भाषेतून मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि आज मणिपुरातील भैय्याजींच्या नावाने काढलेल्या तीन शाळांचे व्यवस्थापनही ते पाहत असतात. हल्ली ते डोंबिवली येथे राहतात. नुकताच २३-०४-२०२३ रोजी, या त्यांच्या कार्यासाठी त्यांचा ’आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्काराने डोंबिवलीत, सन्मान करण्यात आला होता. २६-१०-२०२३ रोजी भैय्याजींचा २४ वा स्मृतीदिन होता. तो साजरा करण्यासाठी श्री. जयवंत कोंडविलकर आणि श्री. नरेंद्र गोळे, पूर्व वैज्ञानिक अधिकारी, भाभा अणुसंशोधन केंद्र, या दोघांनी २४ ते २६ ऑक्टोंबर दरम्यान कोंडये येथे भेट दिली होती. तिचा हा वृत्तांत आहे.
वरील पहिल्या फोटोत रत्नागिरी स्टेशन आणि दुसर्या फोटोत १० सोहम साक्षी, नाचणे रोड, घाग मठाजवळ, शिवाजीनगर, रत्नागिरी येथील श्री. जयवंत कोंडविलकर यांचे हल्लीचे घर दिसत आहे.
वरील पहिल्या फोटोत श्री. जयवंत
कोंडविलकर यांचे कोंडये येथील आज अस्तित्वात असलेले घर दिसत आहे. हल्ली येथे
त्यांचे बंधू राहतात. कोंड्ये येथे आज अस्तित्वात असलेली,
श्री. जयवंत कोंडविलकर यांच्या १९७० मधील शाळेची इमारत. हल्ली ती
दुसर्याच कुणा एकाची खासगी मिळकत झालेली आहे. तिसरा फोटो, अमल विद्यावर्धिनी,
मुंबई, या संस्थेच्या कोंडये येथील ’निर्मला
भिडे जनता विद्यालयाचा’ आहे. १९७० साली श्री. जयवंत कोंडये येथे जी शाळा होती,
त्याच संस्थेची कोंड्ये येथील ही नवी इमारत आहे. इथेच गुरूवार,
२६-१०-२०२३ रोजी, ’भैय्याजी काणे
स्मृतीदिन-२०२३’ साजरा झाला.
श्री. कोंडविलकर हे मुळात जुवाठी
गावाचे रहिवासी होते. त्यामुळे त्यांच्या जुवाठी येथील शाळेतही भैय्याजी काणेंचा स्मृतीदिन साजरा
करण्यात आला. वरील डाव्या चित्रात ती शाळा दिसत आहे. त्याप्रसंगी जुवाठी येथील
शाळेतही ’वायुमंडल’ या
विषयावर श्री. नरेंद्र गोळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. दुसरे
चित्र त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला त्याचे आहे. श्री. कोंडविलकर यांच्या
मणिपूर येथील विद्यार्थी जीवनातील, तसेच १९९९ ते २०२३
दरम्यानच्या २४ वर्षांच्या मणिपुरातील भैय्याजी काणे यांच्या नावाने चालवल्या जात
असलेल्या, तिन्ही शाळांच्या व्यवस्थापन अनुभवांवर आधारित,
’मिशन मणिपूर’ हे पुस्तक यावेळी श्री. नरेंद्र
गोळे यांनी वर्तमान मुख्याध्यापक श्री. गोवळकर सरांना, भेट
दिले.
वरील पहिल्या चित्रात, दोन पोकळ, धात्विक
अर्धगोलांना परस्परांना चिकटून ठेवले आणि त्यांतील हवा काढून टाकली तर ते
एकमेकांना घट्ट चिकटून बसतात. मग इकडे आठ घोडे आणि तिकडे आठ घोडे लावले तरीही ते
सुटत नाहीत, हा प्रयोग करून पाहतांना दोन विद्यार्थीनी दिसत आहेत, तर दुसर्यात,
भैय्याजी काणे स्मृतीदिन-२०२३. विद्यार्थी, शिक्षक,
मुख्याध्यापक आणि पाहुणे दिसत आहेत.
शंकर दिनकर उपाख्य भैय्याजी काणे १९७० साली, शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी मणिपूरला गेले होते. आज तिथे त्यांच्या नावाने तीन शाळा चालतात. मणिपूरला जाण्यापूर्वी ते कोंड्ये, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील शाळेत मुख्याध्यापक होते. त्या त्यांच्या शाळेत २६-१०-२०२३ रोजी त्यांचा २४ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी श्री. जयवंत कोंडविलकर आणि श्री. नरेंद्र गोळे वरील पहिल्या चित्रात दिसत आहेत. दुसर्या चित्रात वर्तमान मुख्याध्यापक श्री. कुराडे सर श्री. जयवंत कोंडविलकर यांचा सत्कार करतांना दिसत आहेत.
श्री. नरेंद्र गोळे यांनी भैय्याजी काणे स्मृतिदिनाच्या निमित्ताने ’वायुमंडल’ या विषयावर वैज्ञानिक प्रयोगांसह व्याख्यान दिले. त्या वेळी उपस्थित असलेले, निर्मला भिडे जनता विद्यालय कोंड्ये येथील, सुमारे २५० विद्यार्थी आणि शिक्षक.
या भेटीदरम्यान दिनांक २५ रोजी उपलब्ध असलेल्या वेळात, श्री. नरेंद्र गोळे यांनी निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडये येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना, ’वृत्तबद्ध मराठी कविता’ या विषयाचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता.
दोन्हीही शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या हार्दिक
सहकार्याने भैय्याजींच्या स्मृती उजागर करण्यात आल्या आणि शिक्षणातून राष्ट्रीय
एकात्मता साधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पुढे चालवण्याचा निर्धार व्यक्त
करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा