कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की, “बायपास सर्जरीशिवाय हृदयविकार निवारण” या पुस्तकाचे लेखक डॉ. भालचंद्र गोखले यांना दि.१२/०१/२०२३ रोजी देवाज्ञा झाली. मी डॉक्टरांच्या घरी तसेच गोरेगाव-मुलुंड रस्त्यावरील प्रयोगशाळेतही एकदा गेलेलो होतो. त्यांच्या चिरजिज्ञासू स्वभावाचे आणि बुद्धिमत्तेचे मला खूप अपरूप वाटे. उत्तम धात्विकीतज्ञ असूनही, त्यांना इतर असंख्य विषयांत कायमच रुची आणि गतीही असे. ई.डी.टी.ए. उपचार पद्धतीवरील त्यांच्या व्याख्यानांनी अगणित डॉक्टरांना मोलाचे ज्ञान मिळवून दिलेले आहे. भारतीय संस्कृतीतील चिरस्थायी अनुभवसाराचे पुनरुत्थान करण्याबाबतही आमच्यात चर्चा झालेली मला आठवते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा