२०२३-०२-२३

आरव गोळेने आज ८ तास ४० मिनिटांत ३९ किमी पोहून धरमतरची खाडी पार केली!

कळविण्यास खूप आनंद होतो की, २२-०२-२०२३ रोजी, कुमार आरव अद्वैत गोळे राहणार डोंबिवली, याने ३९ किमी धरमतरची खाडी ८ तास ४० मिनिटांत पोहून पार केली. त्यानिमित्त आरव, त्याचे कुटुंबिय, त्याचे शिक्षक, त्याचे मदतनीस या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन! आज त्याचे वय केवळ दहा वर्षे आहे!. त्याने अथक परिश्रम घेतले आहेत आणि यशश्री खेचून आणली आहे. यापुढेही अशीच उत्तुंग वाटचाल करण्यासाठी त्याला सर्व गोळे कुळातील मंडळींचे शुभार्शीवाद. श्री. सोमेश्वर देव आणि श्री. करंजेश्वरी देवीचे लाख लाख शुभाशीर्वाद आहेतच. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.

निर्धार स्वाध्याय तपेन प्राप्य, पोहून केलेस स्वतःच साध्य ।
हे आरवा कौतुक ते तुझेही, मातापिता आणि गुरू कृपाही ॥ 

अल्पवयातच परिश्रमपूर्वक थोर यश प्राप्त केले आहेस, हे गोळे कुळास अत्यंत भूषणावह आहे! प्राप्त केलेल्या सर्व सामर्थ्यांचा तुला तुझ्या भावी संकल्पांत खूप उपयोग तर होईलच. त्या सर्व शुभसंकल्पांना सुयश लाभो हीच प्रार्थना!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: