२०२३-०१-२७

निखिल यास विवाहाप्रसंगी त्रिमिती हार्दिक शुभेच्छा!



हे चित्र, कलेचा एक आविष्कार आहे. एक त्रिमितीय-एकचित्र-यदृच्छय-ठसा-बहुशिक्का-रेखन. एका चौकटीत अनेक वार, प्रतलातील दोन्हीही दिशांना, एकाच पुनरावर्ती चित्राचे, अनेक ठसे उमटवले जातात. पुनरावर्ती चित्राच्या प्रत्येक आवृत्तीत किंचितसा बदल करून, त्यांतील फरकाद्वारे पार्श्वभूमीत एक त्रिमितीय चित्र साकारले जाते. पुनरावर्ती ठशाची व आत दडवलेल्या मूळ चित्राची निवड केल्यावर, त्यांपासून असे त्रिमिती चित्र तयार करणार्‍या संगणकीय प्रणाली उपलब्ध आहेत. अशांपैकीच एक वापरून हे चित्रही तयार केलेले आहे.

चित्र कसे वाचाचे हे सांगणारे पद्य मागील बाजूस आहे. चित्रातील सुसंगती शोधण्यास ते उपयुक्त ठरेल, जीवनातील सुसंगतीही शोधण्यासही उपयुक्त ठरू शकेल. पद्यातील दुसरा अंतरा, वधुवरांस अशा प्रकारे सुसंगती साधण्याकरता शुभेच्छा व्यक्त करणारा आहे.

हे चित्र कुणीही सामान्य दृष्टी असलेली व्यक्ती वाचू शकते. त्याकरता, चित्र निर्मितीची पद्धत आणि वाचनाचे निर्देश यांवर थोड्याशा प्रत्यक्ष स्वाध्यायाची आवश्यकता असते.

चित्राच्या प्रतलास सरळ, ताठ, दृष्टीस लंब अशा रीतीने सुस्पष्ट दृश्यमानतेच्या अंतरावर धरावे. मग केंद्रबिंदू पृष्ठभागाच्या सहा इंच खाली (अथवा वर) आहे, असे समजून दृश्य पुन्हा नीट पाहावे. चित्राचा पृष्ठभाग पाण्यासारखा अथवा काचेसारखा नितळ, पारदर्शी दिसू लागतो. आरपार पाहतांना खोलवर (किंवा प्रतलावर उंच उठून) ते साकारलेले चित्र प्रकट होऊ लागते. पूर्णपणे दिसू लागते तेव्हा त्याचे त्रिमितीय अस्तित्व अचंबित करते!

This image, is a piece of art. A three-dimensional-single-image-random-textured patterns stereogram. A single image is repetitively placed one-after another in either of the two dimensions, in a frame of the paper, many times. Small changes are made in each repetitive pattern, so that these differences, create a three dimensional picture in the background. Once the repetitive pattern and the picture are selected, computer programs are available to create the three dimensional picture. This picture is also created using one of such programs.

A poem overleaf, tells how to read this picture. It would be useful for searching the co-relation in the picture, it may also help in co-relating the facts in real life. Second stanza gives the bride and the groom best wishes  in doing so.

This picture can be read by any person with normal vision. It needs an effort to understand the process of its creation and the directions to read it.

Hold the picture straight, upright, directly visible to the eyes, at the distance of distinct vision. Then see it, assuming the focus to be located six inches below (or above) the plane of paper. Plane of the paper may start looking glossy like water or glass surface. Seeing deep through (or elevated above the paper) it, the original picture starts appearing. When it is fully visible, it’s three dimensional existence gives us a surprise.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: