२०२१-०३-०४

अक्षरगण लक्षात कसे ठेवावेत

अक्षरगणवृत्ते तीन तीन अक्षरांच्या गणांनी बनलेली असतात.
र्‍हस्व वा दीर्घ अशा दोन स्वरूपांत असलेली पाठोपाठची तीन अक्षरे,
निरनिराळ्या सर्व प्रकारांनी लिहिली तर ते एकूण २ घात ३ = ८प्रकार होतात. 

य गण, यमाचा
र गण, राधिका
त गण, ताराप
न गणनमन
भ गण, भास्कर
ज गण, जनास
स गणसमरा
म गणमानावा 

हे ते गण आहेत. आता हे लक्षात राहावेत म्हणून संस्कृत साहित्यात
एक सुंदर श्लोक इंद्रवज्रा वृत्तात लिहिलेला आहे. तो असाः 

मूळ संस्कृत श्लोकः

मस्त्रिगुरूस्त्रिलघुश्च नकारः
भादिगुरूः पुनरादिलघुर्यः ।
जो गुरूमध्यगतो रलमध्यः
सोऽन्तगुरूः कथितोऽन्तलघुस्तः ॥

इंद्रवज्रा (ताराप ताराप जनास गागा) 

याचा मराठी अनुवादः

’म’ दीर्घ सारेच, ’न’ सर्व र्‍हस्व
’भ’ दीर्घ आदीच, ’य’ आदि र्‍हस्व ।
’ज’ दीर्घ मध्येच, ’र’ मध्य र्‍हस्व
’स’ दीर्घ अंतीच, ’त’ अंत्य र्‍हस्व ॥ 

उपेंद्रवज्रा (जनास ताराप जनास गागा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: