जगातील सर्वात जड अशा युरेनियम अणूवर, वेगाने विरक्तक (न्यूट्रॉन) कण धडकवल्यास, विदलन (फिजन) घडून येते. ह्या प्रक्रियेत युरेनियम अणू दुभागतो. अदमासे एकाच आकाराचे दोन लहान अणू निर्माण होतात. सरासरीने दर प्रतिक्रियेत तीन नवे विरक्तक जन्माला येतात आणि सरासरीने २० कोटी विजकवोल्ट (विवो) उष्णता मुक्त होते. एका विरक्तकाबदली तीन नवे जन्माला येत असल्याने, तेही पुन्हा अशाच प्रक्रिया घडवून आणू शकतात. अशीच साखळी सुरू राहिली तर सामान्य इंधनाहून सुमारे अब्जपट अधिक ऊर्जा तेवढ्याच इंधनातून मुक्त होऊ शकत असते. हेच आहे अणुऊर्जा निर्मितीचे मुख्य तत्त्व. विदलन.
ह्याच प्रक्रियेचे वर्णन ’श्रवणाभरण’ वृत्तात करण्याचा प्रयत्न
इथे केलेला आहे.
वृत्तः दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण, अक्षरे-२३
गण- न ज ज ज ज ज ज ल ग, यति-७,६,६,४
नमन जनास जनास जनास जनास
जनास जनास लगा-२३
चालः श्री. रामकृष्ण कवींनी रचलेले महिषासुरमर्दिनी स्तोत्र, अयिगिरि नंदिनि
विदलन
संकल्पना, लेखन आणि प्रस्तुतीः नरेंद्र गोळे २०२०१०२०
विदलन ते घडते धडकून
विरक्तक मूळ युरेनियमा
मग अणु भंगुन होय दुभाजन तीन
विरक्तक मोकलिता ।
अणु दुसरेच नवे घडती मग दोन
फुटून दिशा सुटता
विखुरत दोन हजारहि लाख विवो
उरजाहि तशीच तदा ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा