२०२०-०९-२५

आघाडीचे अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू ह्यांचे निधन

कळवण्यास खेद होतो की,
आघाडीचे अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू ह्यांना
काल पहाटे देवाज्ञा झाली! 

१५ ऑगस्ट २०१५ रोजी, डॉ. शेखर बसू, अध्यक्ष अणुऊर्जा आयोग, भाभा अणुसंशोधन केंद्रातील कर्मचार्‍यांना संबोधित करतांना असे म्हणाले होते की, 

“स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूप सार्‍या अपेक्षा निर्माण झाल्या. त्यात शोषणापासून मुक्ती मिळावी, गरीबीतून मुक्ती मिळावी, भूक भागावी आणि रोगराईतून सुटका व्हावी ह्या अपेक्षाही होत्याच. आपण सशक्त राष्ट्र म्हणून उदयास येऊ तेव्हाच आपले स्वातंत्र्य अबाधित राखू शकू. ह्याचाच खरा अर्थ असा होतो की, आपण शिस्तीने, एकत्रितपणे आणि जबाबदार कर्मचारी म्हणून आपल्या देशास आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या सशक्त केले पाहिजे!”


 


अणुक्षेत्रातील कर्मचार्‍यांना स्वातंत्र्यदिनी देशास सामर्थ्यसंपन्न करण्याचा संदेश देणार्‍या देशभक्त, आघाडीच्या अणुशास्त्रास आपण आज मुकलो आहोत. 

भारताच्या अणुइंधन पुनर्प्रक्रियणास परिणतीप्रत आणणार्‍या आणि भारताच्या अणुपाणबुडीच्या स्वप्नास साकार करणार्‍या थोर अणुशास्त्रज्ञास सादर प्रणाम. 

महोदय, 
देश आपल्या कार्यास आणि स्वप्नांना अवश्य परिणतीस नेईल.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: