विनोबा भावे यांची आज १२५-वी जयंती
(जन्मः
११-०९-१८९५, गागोदे; मृत्यूः १५-११-१९८२, पवनार)
विनोबांनी भारतातील निरनिराळ्या भाषांचा अभ्यास केलेला होता. त्याचे मूळ लोकांची मने जिंकणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे हा होता.
विनोबा बहुभाषाप्रभू होते. समर्थ अनुवादक होते. सर्व भाषांत सारखीच धारदार आकलन आणि अभिव्यक्ती सामर्थ्ये बाळगणारे ते सिद्धहस्त अनुवादक होते. त्यांना अर्वाचीन अनुवादकांचे आद्य गुरूच मानायला हवे.
विनोबांची ’गीताई’ अनुवादकांकरता अत्यंत मोलाचा ग्रंथ आहे. एक, दोन आणि तीन अक्षरांचे असंख्य समर्पक प्रतिशब्द मूळ संस्कृत शब्दांकरता गीताईत त्यांनी दिलेले आढळून येतात. आपापल्या मराठी शब्दसंग्रहातील शब्दसंख्या आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्याकरता, मराठीत अनुवाद करू चाहणार्यांनी तर गीताई पाठच केलेली बरी!
त्यांनी सर्व प्रमुख धर्मांचा अभ्यासही केलेला
होता. ते म्हणत की, सर्व धर्मांची समानता व्यवहारात आणायची असेल तर चार गोष्टींची
आवश्यकता आहे.
२. परधर्मसहिष्णुता
३. स्वधर्मातील निरंतर परिवर्तन, जे केल्याविना मानवी प्रगतीस आळा बसेल
४. अधर्मास विरोध
अशा अतुलनीय अर्वाचीन ऋषीस विनम्र अभिवादन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा