संसार माझा
तोः नाजूक मुली तू, नादावलेल्या, वरशी मला, करशील का, संसार माझा?
तीः राकट मुला तू, छांदिष्ट कुठला, हो म्हण मला, कर साजरा, संसार माझा धृ
तो:
जगणे न असते, सहज सोपे, ह्या इथे, हा लढा हे, जाणूनी घे
पळ पळ परीक्षा, होत असते, ह्या इथे, ती सहजच, समजूनी घे
लढ्यातून निभावलीस तर, चालेल मलाही, वरशी मला, करशील का, संसार माझा १
ती:
भवती तुझ्या, तू संग असता, काय वर्णू सदाची, भाव माझे
कसला लढा, अन् परीक्षाही, मुळी न अवघड जाणवे, सोपी वाटे
तू फक्त हो म्हण, मग बहारच की सारी, हो म्हण मला, कर साजरा, संसार माझा २
तो:
हैराण होशील, आमदनीतून, कुटुंबाचा, वाढता, खर्च करता
संत्रस्त होशील, सकाळी सकाळी, तू नळाचे, पाणी भरता
त्यातही न थकलीस तर, प्रेमही करूया, वरशी मला, करशील का, संसार माझा? ३
ती:
जे तू कमावशील, तेच पुरवू, संसाराला, प्रगतीला, कुटुंबाच्या
मी नाही थकणार, रे कधीही, काम घरचे, कितीही, करता करता
हुरूप राखू या अन्, प्रेमही करूया, हो म्हण मला, कर साजरा, संसार माझा ४
- नरेंद्र गोळे
ही कविता मौलिक आहे.
कुठल्याशा हिंदी गाण्याच्या चालीवर म्हणता येत असली तर तो काही कवितेचा दोष ठरत नाही.
1 टिप्पणी:
Khupach Chhan.. aapla Niyamit Vachak... :)
टिप्पणी पोस्ट करा