का रे असा अबोल तू
तीः
का रे असा अबोल तू, काहीतरी तू बोल ना ।
शब्दांना तुझ्या तहानले, मनातले काही बोल ना ॥
तोः
तू सरस परी कुठे, कुठे मी निरस रूक्षसा ।
सुरस कितीही बोललो, रुचेल का तुझ्या मना ॥
तीः
स्फटिक जणू तुझे विचार, स्पष्ट किती तुझे आचार ।
मी गुंतते गुंतते सदा, शब्दांच्या तुझ्या आवर्तनांत ॥
तोः
वळत्या केसांच्या महिरपी, मीन अक्ष बोलके ।
जिवणीच्या मोहक हरकती, सारे कसे लावी पिसे ॥
काही गीते स्वतःतच एक नाद घेऊन येत असतात.
ती इतर गीतांच्या चालीत म्हणता येतीलही.
मात्र ह्या कथेत स्वतःची एक सादही आहे.

- नरेंद्र गोळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा