एक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन म्हणजेच सिंगल इमेज रँडम डॉटस् स्टिरिओग्रॅम (सर्डस्) कलेचे एक उदाहरण इथे देत आहे। एका लग्नानिमित्त वधुवरांसाठी तयार केलेले हे शुभेच्छापत्र आहे. चित्र त्रि-मिती असल्याने ज्यांनी आधी कधी असे चित्र पाहिलेले आहे त्यांना पाहायला अडचण पडू नये. मात्र ज्यांनी त्रि-मिती चित्र कधीच पाहिलेले नाही त्यांना असे चित्र वाचावे कसे ते सांगतो. चित्र ज्या प्रतलावर आहे त्या प्रतलाखाली वीतभर अंतरावर ते साकार होते आहे असे समजून लक्ष केंद्रित (फोकस) केल्यास पृष्ठभाग पाण्यासारखा/काचेसारखा आरस्पानी होतो आणि त्याखाली त्रि-मित चित्र साकार होते.
दुसऱ्या चित्रात, मूळ बहुशिक्कारेखित चित्र वाचावे कसे ह्याचे दिग्दर्शन केलेले. खऱ्याखुऱ्या आयुष्यातही ते तेवढेच उपयोगी पडते, हेही सांगण्याचा प्रयत्न आहे. जे जे पाहू शकतील त्यांनी अवश्य प्रतिसाद द्यावा. ज्यांना दिसू शकले नाही, ते ही प्रयत्नपूर्वक प्रशिक्षणाने पाहू शकतील ह्यात संशय नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा