धनंजय सखाराम डोंगरे
जन्मः
गुरूवार, दिनांकः १३-१०-१९५५,
धनत्रयोदशी,
आश्विन कृष्ण त्रयोदशी, डोंबिवली;
मृत्यूः
बुधवार, दिनांकः ३१-०८-२०२२,
गणेशचतुर्थी,
भाद्रपद शुद्ध चतुर्थी, कल्याण.
धनंजयास
प्रदीर्घ संघ साधना तुझी
कृतार्थ जाहली
कितीक व्यक्ति जोडल्या
कितीक माणसे भली ।
तुझेच नाव घेत ते स्मृती
खुशाल सांगती
धनंजया सदा स्मरेन साथ सर्व
ही तुझी ॥१॥
तुझेच जावई भले तुझी
मुले सुना मुली
तुझीच नातवंडही करीत
आठवे तुझी ।
मलाहि पाठिशी तुझाच धीर
मागता न मी
धनंजया सदा स्मरेन साथ सर्व
ही तुझी ॥२॥
खडे कडे चढूनही गिरीस
सह्य पाहिले
हिमाद्रि पर्वतात
पार्वती नदीस देखले ।
मिळून अंदमानिही समुद्र
धुंडले तळी
धनंजया सदा स्मरेन साथ सर्व
ही तुझी ॥३॥
यथार्थ साथ पत्निही कितीक
माणसे तुझी
तुझीच संस्कृती जगात
आजही प्रसारती ।
सदा सुहास्य बोलके
सहाय्य दे न बोलुनी
धनंजया सदा स्मरेन साथ
सर्व ही तुझी ॥४॥
कृतार्थ याद राहिली जरी
न राहिलास तू
इथे न राहते कुणी मनात
राहिलास तू ।
तिथे तुला मिळो गती सदा
सदाच चांगली
धनंजया सदा स्मरेन साथ
सर्व ही तुझी ॥५॥
नरेंद्र गोळे २०२२०८३१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा