समकालीन विज्ञान आणि दैनंदिन जीवनातील; प्रकाशाचे विविधांगी वर्तन, त्याचे गुणधर्म आणि त्याच्या उपायोजनांच्या परस्परप्रतिसादक्षम प्रारूपांचे कायमस्वरूपी प्रदर्शन; ‘प्रकाश संशोधनालय’ या नावाने ’सुखनिवास पॅलेस, राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञानकेंद्र, इंदौर’ येथे ०८-०७-२०२२ रोजी सुरू करण्यात आलेले आहे. डॉ. अनिल काकोडकर, कुलगुरू होमी भाभा राष्ट्रीय संस्था आणि पूर्व-अध्यक्ष अणुऊर्जाआयोग, तसेच पूर्व-सचिव अणुऊर्जाविभाग, भारत सरकार यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
हे संशोधनालय, इंदौर येथील राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञानकेंद्राच्या आवारातील राज्यवारसा बांधकाम असलेल्या ’सुखनिवास पॅलेस’च्या इमारतीतील ६,५०० वर्गफूट क्षेत्रात वसवण्यात आलेले आहे. ४० हून अधिक प्रदर्शनीय वस्तू इथे भेट देणार्या दर्शकांकरता प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. यात अणुभौतिकीतील तसेच अनेक औद्योगिक उपयोगाची; रुबी आणि इतर अनेक लेझर्स [१] ; प्रकाशतंतू जोडण्या; एकसमयावर्तनक प्रारण; सिर्काडिअन लय आणि इतर लेझर उपायोजने समाविष्ट आहेत.
डॉ. काकोडकर म्हणतात, “...... इथे सुखनिवास पॅलेसमध्ये ’प्रकाश संशोधनालय’ कार्यान्वित झालेले पाहून मी प्रसन्न आहे. राज्यवारसा इमारत आणि आधुनिक विज्ञानाचा हा संगम निश्चितच लक्षणीय आहे. विशेषतः युवा पिढीकरता ....”
राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञानकेंद्र हे इंदौरमधील, अणुऊर्जाविभागाचे एक संशोधन आणि विकास केंद्र आहे. कापत्या धारेचे तंत्र असलेल्या उत्तेजित प्रकाशप्रवर्धन (लेझर) आणि एकसमयावर्तनक या दोन कळीच्या प्रकाशस्रोतांच्या संशोधनात ते सक्रिय आहे. ’प्रकाश संशोधनालया’चा उद्देश, या ’दिप्तीमान विज्ञानक्षेत्रास’ भेट देणार्यांची उत्सुकता वाढवणे, जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यात प्रेरणा निर्माण करण्याचा आहे.
[१] ’ LASER ’ – ’ लाईट ऍम्प्लिफिकेशन युजिंग स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ लाईट ’ म्हणजेच ’ उत्तेजित प्रकाश उत्सर्जनाचा वापर करून केलेले प्रकाश प्रवर्धन ’ अथवा ’ उत्तेजित प्रकाशप्रवर्धन ’.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा