२०१५-१०-२९

काव्यरचनेची लोकप्रिय वृत्ते- ०२

९. इंद्रवज्रा  (११ अक्षरी अक्षरगणयती ५,६)

लक्षणगीतः
स्यादिन्द्रवज्रा यदि तौ जगौ गः
ताराप ताराप जनास गा गा


ती इंद्रवज्रा म्हणिजे कवीने । ता ता ज गा गा गण येत जीने ॥
त्या अक्षरे येत पदात अक्रा । 'तारी हरी जो धरि शंखचक्रा

भगवद्‌ गीता दोनच वृतांत लिहिली गेलेली आहे. बहुतांश श्लोक हे अनुष्टुप्‌ छंदात लिहिले गेले आहेत. तर काही श्लोक इंद्रवज्रा वृतांत. इंद्रवज्राचे उदाहरणः

वासांसि जीर्णानि यथा विहाय । नवानि गृण्हाति नरोऽपराणि ॥
तथा शरीराणि विहाय जीर्णांनि । अन्यानि संयाति नवानि देही ॥ गीता-२-२२

सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे । मनुष्य घेतो दुसरी नवीन ॥
तशीचि टाकूनि जुनी शरीरे । आत्माहि घेतो दुसरी निराळी ॥ गीताई-२-२२

इतर उदाहरणेः

१.         कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावः ।
करोमि यद्यद्‌ सकलं परस्मै । नारायणायच समर्पयामि ॥
२.        चोरा बरा तू मज गावलासी । का सांग येथे अजि पावलासी ॥
ना बोलसी तै चल ठाणियासी । वाचाळ होशील तु पोलिसासी ॥
३.        कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ॥
कारूण्यसिंधू भवदुःख हारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥

आदिशंकराचार्यकृत द्वादशज्योतिर्लिंगस्तोत्रही इंद्रवज्रा वृत्तातच रचलेले आहे.

उदाहरणार्थः

कावेरिकानर्मदयोः पवित्रे समागमे सज्जनतारणाय ।
सदैवमान्धातृपुरे वसन्तमोङ्कारमीशं शिवमेकमीडे ॥ ४ ॥
द्वादशज्योतिर्लिंगाणि - श्रीमत्‌ आदि शंकराचार्य


१०. उपेंद्रवज्रा (११ अक्षरी अक्षरगणयती ५,६)

लक्षणगीतः जनास ताराप जनास गा गा

उपेंद्रवज्रा म्हणतात तीलाज ता ज गा गा गण येती जीला 
पदास होणे शिव अक्षरांनीपहा मनी धुंडिशी काय रानी ॥

उदाहरणः
.
तया वनी एक तटाक तोये । तुडुंबले तामरसानपाये ॥
निरंतरामंद मरंद वाहे । तपांतही यास्तव रिक्त नोहे ॥

एकूण २२५ श्लोकांच्या “नल-दमयंती स्वयंवर” आख्यानातहे वृत्त फक्त एकदाच योजले आहे.
.
यदिंद्रवज्रा चरणेषुपूर्वे भवन्ति वर्णा लघवः सुवर्णे ।
अमंदमाद्यन्मदने तदानी मुपेंद्रवज्रा कथिता कविंद्रैः ॥ - श्रुतबोध-२२

११. उपजाती (११ अक्षरी अक्षरगणयती ५,६)

पहिल्या आणि तिसर्‍या चरणांत इंद्रवज्रा, व दुसर्‍या आणि चवथ्या चरणांत उपेंद्रवज्रा असेल तर ते उपजाती वृत्त होय.

उदाहरणः कविता, वनसुधा; कवीः वामन पंडित

परोपरी खेळति जी वनात । .................... इंद्रवज्रा (ताराप ताराप जनास गा गा)
अर्पूनि चित्ते जगजीवनात ॥ .................... उपेंद्रवज्रा (जनास ताराप जनास गा गा)
धरूनिया मर्कटपुच्छ हाती । .................... इंद्रवज्रा (ताराप ताराप जनास गा गा)
तयांसवे वृक्षि उडो पहाती ॥ .................... उपेंद्रवज्रा (जनास ताराप जनास गा गा)

१२. अनुष्टुप्‌ छंद

अनुष्टुप्‌ छंद अथवा वृत्त म्हणजे अष्टाक्षरी चार चरणांचे काव्य. ह्यालाच श्लोक असेही म्हणतात. रामरक्षेतील बरेचसे काव्य ह्याच छंदात लिहिले गेले आहे. ह्या छंदाचे वर्णन संस्कृत श्लोकात खालील प्रमाणे केले गेलेले आहे. त्यात असे म्हटले आहे कीश्लोकाच्या प्रत्येक चरणातील आठ अक्षरांमध्ये पाचवे र्‍हस्व (लघु)सहावे अक्षर दीर्घ (गुरू)सातवे अक्षर पहिल्या व तिसर्‍या  चरणांत दीर्घ (गुरू) असतेतर दुसर्‍या व चवथ्या चरणांत र्‍हस्व (लघु) असते [१].

श्लोके षष्ठं गुरू ज्ञेयं सर्वत्र लघु पञ्चमम्‌ । द्विचतुःपादयोर्र्‍हस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥ श्रुतबोध-१०[२]
मराठी अनुवादः सहावे गुरू सर्वत्रलघु सर्वत्र पाचवे । समांत सातवे र्‍हस्वविषमी दीर्घ ते असे ॥

अक्षर
चरण
गा
गा
गा
गा
गा
गा
उ-१
श्लो
के
ष्ठं
गु
रू
ज्ञे
यं
उ-२
र्व
त्र
घु
ञ्च
मं
उ-३
द्वि
तुः
पा
यो
र्र्‍ह
स्वं
उ-४
प्त
मं
दी
र्घ
न्य
योः

मराठीमध्ये जो छंद वा वृत्त यांपैकी कोणत्याच प्रकारात बसू शकत नाहीतथापि तो मुक्तही नाहीअसा जो तो अनुष्टुप्‌ छंद होय. अनुष्टुप्‌ अष्टाक्षर-नियत आहेतरी त्यातील अर्ध्या भागात लघुगुरुत्वाचा विचार करावा लागतोपण अर्ध्या भागात तो तसा करावा लागत नाहीतसेच त्याचे लक्षण, मात्रामापनानेही वर्णन करता येत नाही [३]. चरणांती यती येत असल्यामुळे आठवे अक्षर लघु असले तरी त्याचा उच्चार दीर्घच होतो. त्यामुळे आठवे अक्षर दीर्घ असावे ही अट सांगितलेली नाही.  भगवत् गीता आणि गीताई ह्यांतील बहुतांशी श्लोक अनुष्टुप् छंदातच रचलेले आहेत. उदाहरणार्थः
.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरः । तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ गीता-१८-७८
योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर । तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥ गीताई-१८-७८
.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरूदेव महेश्वर ।  गुरू साक्षात परब्रम्ह म्हणून गुरू वंदू या ॥ - मराठी
.
उद्योगेनैव सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथै:  न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: 
केल्याने होत आहे रेइच्छिल्याने न केवळ । न कधी सूप्त सिंहाच्या तोंडी प्रवेशती पशू ॥ - मराठी

१३. साकी

अभंगओवीघनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असतात. अर्थातया पद्यप्रकारात मुख्य नियमन अक्षरसंख्येचे दिसते. प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचा असल्यामुळे या पद्यप्रकारात अष्टमात्रक आणि षण्मात्रक अशा दोन आवर्तनांची रचना होऊ शकते. या लगत्वभेदातीत अक्षरसंख्याक पद्यप्रकाराला काहीतरी पारिभाषिक नाव पाहिजे म्हणून डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांनी त्यांच्या "छंदोरचना" ह्या अत्यंत मौलिक ग्रंथातवैदिक पद्यप्रकाराला असणारे छंद हे नाव दिले आहे.

र्‍हस्व अक्षराची एक मात्रा आणि दीर्घ अक्षराच्या दोन. काव्याच्या एका ओळीतील सर्व मात्रांची मिळून संख्या एकच राखली जाते त्या काव्यप्रकारांना जाति (किंवा मात्रावृत्ते अथवा श्लोक) म्हणतात. साकी (लवंगलता) हा काव्यप्रकारही असाच आहे.

वृत्त: हे वृत्त समजाती (पद्यातील सर्व पंक्ती सारख्याच असल्या की त्यास सम म्हणावयाचे), मात्रावृत्तआहे. ह्यात ८+८+८+४ = २८ मात्रा एका ओळीत येत असतात.


उदाहरणः
१. औदुंबर

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन ।  निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून ॥
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे । शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे ॥

पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे। हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे ॥
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर।पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर ॥                     
कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

२. आचार्य अत्रे ह्यांची विडंबित कविता “’कवी आणि चोर”’

पाल पाहुनी जसा बिचारा विंचू टाकी नांगी;
तसा आमुचा नायक खिळला उभा जागच्या जागी!
भान विसरला, कार्य विसरला, टकमक पाहत राही,
वेळ लोटला, असा किती तरि, स्मरण न त्याचे काही!

. दिंडी

दंडी हे वाद्य घेऊन फिरणार्‍यागोसाव्यांची एक जमात असे. तिच्या वाद्यावरून ह्या वृत्तासदंडीदिण्डीदिप्डीकिंवा दंडीगाण असे संबोधले जाते. परशुरामतात्या गोडबोले ह्यांच्या वृत्तदर्पणात अशी माहिती दिलेली आहे की, “दिंडीला चार चरण असतात. चरणांच्या अखेरीस अनुप्रास किंवा यमक असते. ह्या छंदास अक्षरांचा नियम नाही परंतु मात्रांचा नियम आहे. म्हणून हे मात्रा वृत्त आहे. प्रत्येक चरणात एकोणीस मात्रा असतात आणि नवव्या मात्रेवर अवसान असते म्हणून प्रत्येक चरणाचेनऊ मात्रांचा एक आणि दहा मात्रांचा एक असे दोन भाग पडतात. पहिल्या भागात प्रथम तीन मात्रांचा एक गण असावा. त्यात एक गुरू व एक लघु किंवा एक लघु व एक गुरूकिंवा तीनही मात्र लघु असाव्यात. त्यापुढे तीन गुरू किंवा सहा लघु किंवा लघु व गुरू मिळून सहा मात्रांचा गण असावा. दुसर्या  भागात पहिल्याप्रमाणेच प्रथम तीन मात्रांचा एक गण असावा. मग पुन्हा आणखी तीन मात्रांचा तसाच एक गण असावा. अखेरीस दोन गुरू असावेत.

रघुनाथ पंडितांचे हे सर्वात आवडते वृत्त असावे. एकूण २२५ श्लोकांच्या नल-दमयंती स्वयंवर” आख्यानातहे वृत्त त्यांनी ६९ वेळा योजले आहे.

उदाहरणः
१.
तोच उदयाला येत असे सूर्यअहो क्षितिजावर त्याच नव्हे काय?
तेच त्याचे कर न का कुंकुमानेवदन पूर्वेचे भरति संभ्रमाने?
अढळ सौंदर्यकेशवसूत
२.
पोर खाटेवर मृत्युच्याच दाराकुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणातसेविकेचा आधार एक हात !
- कवीः गिरीश यशवंत कानिटकर
३.
हंस मिळणे हे कठिण महीलोकी, सोनियाचा तो नवल हे विलोकी ।
तशा मजलाही सोडिले तुवा कीतुझा ऐसा उपकार मी न झाकी ॥
- नल-दमयंती स्वयंवर, कवीः रघुनाथ पंडित

. देवप्रिया

देवप्रिया हे मराठी भाषेत फार मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले वृत्त आहे. हे नावही श्री. माधव ज्युलियन यांनी दिलेले आहे. या अक्षरगणवृत्ताचे मात्रांच्या हिशोबात ७-७-७-५ असे उपभाग आहेत.

लक्षणगीतः
राधिका ताराप गा गाराधिका ताराप गा
गा ल गा गागा ल गा गागा ल गा गागा ल गा

देवप्रियाचे उदाहरण: काही लोकप्रिय गीते

१. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी http://www.aathavanitli-gani.com/Song/Shukratara_Mand_Vara
२. त्या फुलांच्या गंधकोशी  http://manik-moti.blogspot.in/2010/04/blog-post_19.html
३. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले  https://www.youtube.com/watch?v=eFbJAXnhxVM

शुक्रतारामंद वाराचांदणे पाण्यातुनी
चंद्र आहेस्वप्‍न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला ?
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा

लाजर्‍या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा

शोधिले स्वप्‍नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा

गीत- मंगेश पाडगांवकरसंगीत- श्रीनिवास खळे
स्वर- अरूण दाते ,  सुधा मलहोत्रा;  राग- यमनकल्याण

त्या फुलांच्या गंधकोशी http://manik-moti.blogspot.in/2010/04/blog-post_19.html

त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस कात्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी, होवूनी आहेस कागात वायूच्या स्वरानी, सांग तू आहेस का?

मानवाच्या अंतरीचा, प्राण तू आहेस कावादळाच्या सागराचे, घोर ते तू रूप का?
जीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ काआसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का?

जीवनी संजीवनी तू, माउलीचे दूध काकष्टणार्‍या बांधवांच्या, रंगसी नेत्रात का?
मूर्त तू मानव्य का रेबालकांचे हास्य काया इथे अन्‌ त्या तिथे, रे सांग तू आहेस का?

गीतः सूर्यकांत खांडेकरसंगीतः पं. हृदयनाथ मंगेशकरगायकः सुरेश वाडकर

१६. मालिनी

मालिनी हे अत्यंत गोड वृत्त आहे. पहिल्या सहा लघु अक्षरांची मजा लुटायची असेल तर यासारखे दुसरे वृत्त नाही. हे अक्षरगणवृत्त असूनप्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात. यती ८-व्या अक्षरावर असतो. उदाहरण:
१.
कणभर उरलेले रूप माझे उरी घे,  मधुतर जळवंती हात माझे करी घे
तनुभर जमलेली रात्र घे ना मिठीला, क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला - ग्रेस

२. उडत उडत चाले जेवि मंडूकजाती, उकड बसति तैसे त्यासवे तीव्र जाती
न बहु पसरितां ते हस्तपादादि, पाणी, तरति नवल पाहे हांसतो चक्रपाणी - वनसुधा, वामन पंडित

संदर्भः
१. श्रुतबोध- कविकुलगुरू महाकवि कालिदास, एकूण पृष्ठे-२३
२. छंदःशास्त्राची चाळीस वर्षे, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरपूर्वप्रसिद्धी: नवभारतसप्टेंबर१९६२, http://vechak.org/chandashastrachi40varshe
३. छंदोरचनाः मा.त्रिं.पटवर्धन, पृष्ठसंख्या-५१४
४. गझलेचा आकृतिबंध सुरेश भट ह्यांचेवरील संकेतस्थळ http://www.sureshbhat.in/node/12
५. द स्टुडंटस्‍ न्यू संस्कृत डिक्शनरी, चवथी आवृत्ती, १९८७, मूल्य रू.१००/- फक्त.
६. विश्वकोशातील छंदोरचनेवरील लेख https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/component/content/article?id=11059
७. रघुनाथ पंडित विरचित नल-दमयंती स्वयंवर, संपादकः प्रा.श्री.र.भिडे, सोमैय्या पब्लिकेशन्स, १९७१, किंमत रु.६/- फक्त.
८. अनुवाद पारिजात http://anuvadparijat.blogspot.in/2015/05/blog-post_12.html


६ टिप्पण्या:

mannab म्हणाले...

प्रिय नरेंद्रजी,
सप्रेम नमस्कार

काल सहज मी तुमची अनुदिनी वाचायला उघडली आणि मला सुखद धक्का बसला. मी जरी कवि नसलो तरी मला त्याची थोडी जाण आहे. आपण किती कष्ट घेऊन हे लिहिले आहे. म्हणून मी पहिल्या भागातील लिखाण शोधून काढले व वाचले.
मला ठाऊक नसलेली माहिती दिल्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच होतील. असेच लिहा आणि पुढील भाग प्रसिद्ध झाल्यावर अवश्य कळवा.
मंगेश नाबर

ऊर्जस्वल म्हणाले...

धन्यवाद नाबर साहेब! आपल्यासारख्या रसिकांच्या अभिप्रायांनी लिहिण्याची उमेद जागी राहते. - नरेंद्र गोळे

Kavyras.bloggspot.com म्हणाले...

फारच महत्वाची माहिती आणि संकलन.आवडले सर धन्यवाद

dndabke म्हणाले...

खूपच छान माहिती. खूप मेहनत घेतलेली दिसते. धन्यवाद.
. एक सुचना.. इंद्रवज्रा.. वासांसि जीर्णानि. व सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे । मनुष्य घेतो, कायेन वाचा, कैलासराणा.. ही सर्व उदाहरणे उपजातीची आहेत. चुकभूल द्यावी, घ्यावी.

dndabke म्हणाले...

उपजातीचे उदाहरण..
परोपरी खेळति जी वनात । .................... इंद्रवज्रा (ताराप ताराप जनास गा गा)
अर्पूनि चित्ते जगजीवनात ॥ .................... उपेंद्रवज्रा (जनास ताराप जनास गा गा)
धरूनिया मर्कटपुच्छ हाती । .................... इंद्रवज्रा (ताराप ताराप जनास गा गा)
तयांसवे वृक्षि उडो पहाती ॥ .................... उपेंद्रवज्रा (जनास ताराप जनास गा गा)
उपजातीच्या या उदाहरणात इंद्रवज्रा व उपेंद्रवज्रा यांची अदलाबदल झाली आहे. सुधारावी कृपया.

dndabke म्हणाले...

यदिंद्रवज्रादचरणेषुपूर्वे इथे द नको. कारण अक्षरे अकराच हवी.
दि दीर्घ असेल. यदीन्द्रवज्राचरणेषु पूर्वे . यदि + इन्द्रवज्रा. असे असेल. सुधारणा करावी. बाकी माहिती उत्तम व उपयुक्त आहे. धन्यवाद.