बहुधा तुम्हाला माहीत असेल की भव्य रेडवूड वृक्ष केवळ अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरच वाढतात. पृथ्वीतलावर इतरत्र कुठेही नाही. त्या वृक्षांची मजबुती आणि आकार स्तिमित करणारा असतो. ते भव्य असतात.
एकमेकांच्या एवढे जवळ वाढतात की त्यांच्या फांद्यांमधून सूर्यप्रकाश दिवसाही गाळून येतो आणि त्यांचे गगनभेदी सुळके आकाशातील ढगांनाही स्पर्श करतात.
बहुतेक वृक्षांवर जळल्या-भाजल्याच्या खुणा असतात. भूतकाळातील कठीण प्रसंगांच्या आठवणी होऊन.
काहींच्या खोडांच्या मध्यभागांतून वणव्यामुळे मोठाल्या ढोल्या निर्माण होतात. एवढ्या मोठ्या की त्यांच्या आत दोन वा तीन माणसे उभी राहू शकतात. तरीही ते वृक्ष जगत असतात. एवढे जीवनासक्त, की त्यांना नाहीसे करणे काळालाही शक्य होत नाही आणि त्यामुळेच ते सर्व व्रण महत्त्वहीन भासू लागतात.
त्यांची उंची तीनशे फुटांहून जास्त असते. म्हणजेच तीस मजल्यांहूनही जास्त.
त्यांची उंची तीनशे फुटांहून जास्त असते. म्हणजेच तीस मजल्यांहूनही जास्त.
ते १,४०० वर्षांपासून जगत आहेत. म्हणजे कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला तेव्हा ते आधीच ९०० वर्षे जगलेले होते.
मग रेडवूड वृक्षांचे रहस्य काय? ते एवढे दीर्घायू कसे? आणि तरीही टिकून कसे राहतात?
मग रेडवूड वृक्षांचे रहस्य काय? ते एवढे दीर्घायू कसे? आणि तरीही टिकून कसे राहतात?
ज्या झाडांना सोटमूळ असते, ती जेवढी उंच गेलेली असतात, तेवढेच त्यांचे सोटमूळ खोलवर गेलेले असते. (म्हणजे ३० फूट उंच, ३० फूट खोल.) रेडवूड वृक्षांना मुळी सोटमूळच नसते. म्हणूनच तुम्हाला रेडवूड वृक्ष कधीही एकटा उभा दिसत नाही! कधी नाही!!
ते नेहमीच 'ग्रूव्ह' नावाच्या जत्थ्यांमध्ये राहतात. वृक्षाची शक्ती त्याच्या स्वतःत नसते. प्रत्येक फूट उंचीसोबतच त्याची मुळे खोल नव्हे, तर आजूबाजूंना तीन फूटांपर्यंत पसरतात. होय. आजूबाजूंना! त्याची शक्ती अशी येते. वृक्ष जर ३०० फूट उंच असेल तर त्याची मुळे ९०० फूट दूरवर पसरतात. ग्रूव्हमधल्या सर्व वृक्षांच्या मुळांसोबत घट्ट वीण विणत. काही शतके उलटल्यावर, सभोवारच्या सर्व मुळांसोबत ती मुळे एवढी गुंतून जातात की मग ते झाड पडण्याचा संभवच राहात नाही. त्याच्या भावा-बहिणींच्या आधारेच ते उभे राहते.
एकेकट्याने आपण हननक्षम असतो. आपण सहजी मिटून जाऊ शकतो. मात्र एकजुटीने आपण सर्व बांधल्या जातो. बल प्राप्त करतो. सावकाश आणि समजुतीने आपण एकमेकांना सशक्त करू शकतो, आधार देऊ शकतो. विशालकाय रेडवूड वृक्षाप्रमाणेच, आपणही उंच, धीट आणि कणखर होऊ शकतो.
एकेकट्याने आपण हननक्षम असतो. आपण सहजी मिटून जाऊ शकतो. मात्र एकजुटीने आपण सर्व बांधल्या जातो. बल प्राप्त करतो. सावकाश आणि समजुतीने आपण एकमेकांना सशक्त करू शकतो, आधार देऊ शकतो. विशालकाय रेडवूड वृक्षाप्रमाणेच, आपणही उंच, धीट आणि कणखर होऊ शकतो.
परस्परांच्या मैत्री, निगा आणि प्रेम ह्यांच्या भरोश्याने सारे काही तरून जाऊ शकतो. एकट्याने न साधणारी कामे आपण एकजुटीने साध्य करू शकतो. तुम्ही किती उंच वाढू शकता, किती मजबूत होऊ शकता हे बर्याच प्रमाणात तुम्ही इतरांना काय देता ह्यावरच अवलंबून असते. जेवढे अधिक द्याल तेवढेच अधिक मिळवाल. तुम्हाला सशक्त व्हायचे असेल तर इतरांना सशक्त करायला हवे. परस्परांना सशक्त करणारेच हे धोरण आहे.
हाच तर रेडवूड वृक्षांचा संदेश आहे.
.
श्रेय अव्हेर: या लेखातील सर्वच प्रकाशचित्रे मी काढलेली नाहीत. त्यांचे मूळ स्त्रोतही मला माहीत नाहीत.
४ टिप्पण्या:
Nice one.
Can you tell me where the first photo was taken?
नारळाच्या झाडाना सोटमूळ नसते तर तंतुमूळ असते.
फोटोग्राफर पप्पू महाशय, आपण प्रकाशचित्रांचे मूळ स्त्रोत ओळखत असल्यास कृपया अवगत करावेत. त्यांची चित्रे वापरल्याखातर मी श्रेयनिर्देश नक्कीच करेन!
अनाम वाचक महाशय, आपल्या माहितीबद्दल आभार! मलाही नारळाच्या झाडास सोटमूळ नसावे अशी माहिती लक्षात आल्याने मूळ लेखातून नारळाच्या झाडाचा संदर्भ काढून टाकला आहे. धन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा