मराठी
आन्हिकांत येथल्या उजाडते मराठी । दैनिकांत येथल्या विकासते मराठी ॥
माध्यमांत येथल्या प्रकाशते मराठी । स्वउद्यमांत उमलुनी विराजते मराठी ॥१॥
निष्पक्ष न्यायपालिकेस चाहते मराठी । सक्त, कार्यपालिकेस सदा ठेवते मराठी॥
स्वैर विधीपालिकेस न होऊ दे मराठी । प्रशासनास प्रजाभिमुख राखते मराठी॥२॥
'पौरूषास अटक' दुःखद मानते मराठी । 'नृपती पाप' क्षण न साहू पाहते मराठी॥
'देहांत प्रायश्चित्त' तरीही राखते मराठी । निसर्गन्याय सर्व श्रेष्ठ मानते मराठी ॥३॥
संगणकावरही टाच ठेविते मराठी । विश्वव्यापी जाल भरून राहते मराठी ॥
इथे तिथे मनोगते ही मांडते मराठी । मनोगतावरी खुशाल नांदते मराठी ॥४॥
नरेंद्र गोळे २००५०४०८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा