बेरंग
विहरलो वार्यापरी मी कधीचा, तरी मी मुळी अनिरुद्ध नाही ।
लाभला मज कुणाचा संग नाही, तरी मी मुळी निस्संग नाही ।।
रचनेस माझ्या कोणताही बंध नाही, तरी तीही अनिर्बंध नाही ।
मी न गहिरे रंग भरले तरीही, चित्र माझे एकही बेरंग नाही ॥
'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा