२००८-०५-०९

ए माझे संजीवनी

ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही
अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा
तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा

ते कटाक्ष, ती चपळाई अन, जी तुझ्यात असे, नसे कुठे
ती कला मनास मोहवी जी तुझ्यात असे, नसे कुठे
मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा

तू मधुर जे बोल बोलशी, हसून जराही सुंदरी
तर अजूनही स्पंदने, नशेत धुंद रंगती
ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा

नरेंद्र गोळे २००८०३१५

1 टिप्पणी:

आशा जोगळेकर म्हणाले...

सहजच तुमची जुनी पोस्ट पाहिली अन् ही कविता सापडली एकदम रोमांटिक . कोण ह्या संजीवनी आमच्या वहिनी कि...........