२०१२-१२-१३

मेळघाट २०१२ – २०१३

 १०० दिवसांच्या शाळेकरता स्वयंसेवक हवेत

मायबोली डॉट कॉम वरील हर्पेन उपाख्य हर्षद पेंडसे ह्या व्यक्तिरेखेने, ’ध्यासपंथी पाऊले’ ह्या सदरात लिहिलेल्या लेखाचे पुनर्प्रकाशन, इथे  त्यांचेच सांगण्यावरून करत आहे.  आपणासही ह्या चांगल्या कामास हातभार लावता येईल.

--------------------------------------------------------------------------------

'मैत्री शाळा १०० दिवसांची - मुलांच्याच गावी' (मेळघाट २०१२ – २०१३) स्वयंसेवक हवेत.
नमस्कार!
गेल्या १५ वर्षांपासून पुणेस्थित 'मैत्री' नावाची एक संस्था, प्रामुख्याने, मेळघाटात कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे बालमृत्यु टाळण्यासाठी व इतर भेडसावणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. (अधिक माहितीसाठी भेट द्या - www.maitripune.net) तेथे पावसाळ्यात होणारे बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते, त्याकरता, आखून घेतलेल्या कार्य़क्षेत्रामधे 'शुन्य बालमृत्यु' हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन, धडक मोहीमा आखणे व त्याची अंमलबजावणी करणे हे काम करण्यात येत आहे.
'मैत्री'ला नेहेमीच ह्या सर्व कामामधील प्रत्य़क्ष लोकसहभाग हा जास्त मोलाचा वाटत आलेला आहे.
हे काम आपल्या-तुपल्या सारख्या सर्वसामान्य (इथे सर्वसामान्य हा शब्द, ज्यांचे शिक्षण / ज्यांचा पेशा समाजसेवा ह्या विषयातला नसून इतर काहीतरी आहे, अशा हिशोबाने योजला आहे.) लोकांना कार्यकर्ते म्हणून सामील करवून घेऊन करण्यात येते.
ह्या दरम्यान (गेल्या १५ वर्षात) असेही जाणवले की तात्कालिक वैद्यकीय मदतीबरोबरच एकंदरीत स्थानिक 'कोरकू' समाजामधल्या लोकांमधे शिक्षणाबाबत जागृती घडवून आणली तर 'कुपोषण' ह्या समस्येच्या मुळावरच घाव घातल्यासारखे होईल.
ह्या विचारधारेतलाच एक भाग म्हणून, गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०११ ते मार्च २०१२ या काळात मेळघाटातील शाळाबाह्य ४० मुलांकरता 'मैत्री' ने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. मी, हर्षद पेंडसे, गेल्यावर्षी स्वतः स्वखर्चाने ह्या उपक्रमात सहभागी झालो होतो व त्यामुळेच हे निवेदन सादर करत आहे.
या शाळेला स्वयंसेवक आणि देणगीदारांचा व अर्थातच मेळघाटातील मुला-पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विविध कारणांमुळे शाळा सुटलेल्या अथवा शाळेत जावू न शकलेल्या ४० मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याच्या 'मैत्री'च्या उद्देशाला नक्कीच यश मिळाले. आज ही मुले वेगवेगळ्या आश्रम शाळेत पुन्हा दाखल होवून शिकू लागली आहेत. चांगले मार्गदर्शन मिळाले तर आपण शिकू शकतो हा विश्वास त्यांना व त्यांच्या पालकांनाही मिळाला आहे. या शाळेच्या निमित्ताने मेळघाटात 'शिक्षण विषयक काहीतरी भरीव व चिरस्थायी अशा कामाचा' संकल्प 'मैत्री' ने सोडला. 'सरकारी शाळांना समांतर अशी व्यवस्था निर्माण न करता मेळघाटातील मुले उत्तम रीतीने कशी शिकू शकतील' हा विचार समोर ठेवून यावर्षीच्या व पुढील वर्षांच्या प्रकल्पांचा/उपक्रमांचा विचार केला आहे.
कसे असेल या उपक्रमाचे स्वरूप?

डिसेंबर ते मार्च या काळात १०० दिवस आपण गावात जावून शाळांना मदत करणार आहोत.
प्रत्येक शाळेत २ स्वयंसेवक एक आठवडा जातील व काम करतील. पुढच्या आठवड्यात नवीन स्वयंसेवक जातील आणि अशा रीतीने १०० दिवस स्वयंसेवक गावात असतील.
शिक्षक असेल तेव्हा शिक्षकाच्या बरोबर व नसेल तेव्हा स्वतंत्रपणे शाळेतच हे स्वयंसेवक मुलांना भाषा, गणित, विज्ञान व आरोग्य हे विषय शिकवतील. तसेच गाणी, गप्पा, गोष्टी, चित्रकला, हस्तकला, प्रयोग व मैदानी खेळ सुद्धा घेतील.
८ ते १२ वयोगटासाठी आवश्यक असलेली भाषा व गणित विषयांच्या क्षमता मुलांमध्ये याव्या हे शिकवण्याचे प्रमुख उद्दिष्ट असेल. इतर सर्व गोष्टी याच्याशी पूरक अशा घेतल्या जातील.
'स्वयंसेवक शिक्षक' चिलाटी येथे मैत्रीच्या केंद्रावर राहतील व दररोज चालत ठरलेल्या गावी जातील.
'स्वयंसेवक शिक्षकांनी' काय शिकवायचे याचा आराखडा त्यांना पुण्यामधून दिला जाईल, त्याचे आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल व त्याकरता लागणारी साधने पण दिली जातील.
आराखडा डिसें २०१२ ते मार्च २०१३
एकूण गावे - ३ (प्रत्येक गावात १ शाळा)कालावधी - ७ डिसेंबर २०१२ ते १५ मार्च २०१३ (१४ आठवडे/ १०० दिवस)लागणारे एकूण स्वयंसेवक - ८४ (प्रत्येक आठवड्याकरता ६ )एकूण मुले - ६० (प्रत्येक शाळेत २० याप्रमाणे)
स्वयंसेवक वेळापत्रक :

तुकडी क्र.
पुण्या पासून
मेळघाटातून परत



०७-१२-२०१२
१६-१२-२०१२
१४-१२-२०१२
२३-१२-२०१२
२१-१२-२०१२
३०-१२-२०१२
२८-१२-२०१२
०६-०१-२०१३
०४-०१-२०१३
१३-०१-२०१३
११-०१-२०१३
२०-०१-२०१३
१८-०१-२०१३
२७-०१-२०१३
२५-०१-२०१३
०३-०२-२०१३
०१-०२-२०१३
१०-०२-२०१३
१०
०८-०२-२०१३
१७-०२-२०१३
११
१५-०२-२०१३
२४-०२-२०१३
१२
२२-०२-२०१३
०३-०३-२०१३
१३
०१-०३-२०१३
१०-०३-२०१३
१४
०८-०३-२०१३
१७-०३-२०१३


तुम्ही कशा प्रकारे सहभागी होवू शकता?
१० दिवस मेळघाटात प्रत्यक्ष शिकवण्याकरता जावून
मेळघाटात जाण्याकरता स्वयंसेवक मिळवून देवून
या उपक्रमासाठी आर्थिक/ वस्तुरूपाने मदत करून (एकूण अपेक्षित निधी - अंदाजे रु. २ लाख)
या उपक्रमासाठी वस्तुरूपाने मदत करून
बालवाडीच्या मुलांसाठी गोष्टीची पुस्तके
ओरिगामी, चित्रकला, हस्तकला याचे साहित्य
मुलांच्या वैयक्तिक आरोग्याकरता साहित्य ( ब्रश , पेस्ट, साबण, तेल)
विज्ञानाकरता प्रयोग साधने व उपकरणे
पुण्यामधील कामामध्ये सहभागी होवून
उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून
संपर्कासाठी: मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२/ ७५८८२८८१९६ (वैशाली, मधू, लीनता ),
अश्विनी धर्माधिकारी : ९४२२० २५४३१

मैत्री: ३२, कल्याण, नटराज सोसायटी, कर्वेनगर, पुणे ४११०५२
दूरध्वनी: +९१-२०-२५४४३१३४, कार्यालय: +९१-२०-२५४५०८८२
विरोप पत्ता : maitri1997@gmail.com www.maitripune.net
नोंदणी क्र.ई-२८९८/पुणे
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: