अनुदिनी: वातकुक्कुट. हवामानशास्त्राची ओळख मराठीतून.
http://vatkukkut.wordpress.com/
अनुदिनीकार: वरदा वैद्य
अनुदिनीची सुरूवात: नोव्हेंबर २००६
अनुदिनीची वाचकसंख्या: २०१० मध्ये २,९००
अनुदिनीतील एकूण नोंदी: २३
अनुदिनीकाराची ओळख: त्या स्वतःची ओळख अशी करून देतात, “मी वरदा वैद्य. सध्या वास्तव्य-अमेरिकेची संयुक्त संस्थाने. हवामानशास्त्र आणि खगोलशास्त्र हे माझ्या आवडीचे विषय. हवामान आणि वातावरण ह्या विषयातील विविध गोष्टी मराठीतून सांगण्यासाठी वातकुक्कुट ही अनुदिनी सुरू केली आहे. खगोलशास्त्र विषयक लेख हे विवस्वान ह्या अनुदिनीवर ठेवले आहेत. पत्ता पुढीलप्रमाणे आहे. http://khagras.wordpress.com/
अनुदिनीची अनुक्रमणिकाः नोंदी, प्रतिक्रिया , वातावरणातील अभिसरण, एन्सो, विद्युत्पात, त्सुनामी, चंद्राचे महत्त्व, पारिभाषिक संज्ञा, कात्रणे, भूपट्ट विवर्तन
अनुदिनीची ओळख लेखिकेच्याच शब्दांतः “वातकुक्कुट – हवामानशास्त्राची ओळख मराठीतून. हवामानशास्त्राची ओळख मराठीतून करून देण्याचा हा प्रयत्न तुम्हा वाचकांना आवडेल अशी आशा करते. गेल्या काही वर्षांमध्ये मनोगत.कॉम ह्या संकेतस्थळावर मी हवामानशास्त्रांतर्गत येणाया विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख लिहिले. काही विषय माझ्या आवडीचे, तर काही इतरांनी सुचवलेले. हे लेख एकत्रित स्वरूपात ठेवता यावेत म्हणून हा अनुदिनी (ब्लॉग) प्रपंच. ह्या अनुदिनीचे यथावकाश संकेतस्थळामध्ये रुपांतर करण्याचा मानस मी बाळगून आहे.”
अनुदिनीतील चर्चा विषय
त्सुनामी - त्सुनामी म्हणजे काय? ती का, कशी आणि केव्हा तयार होते? त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणा-या यंत्रणेचे कार्य कसे चालते, त्सुनामी प्रारूप (मॉडेल) म्हणजे काय असते? ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात मिळवण्यासाठी वाचा तीन भागांची लेखमाला-
१. या गो दरियाचा दरारा मोठा..
२. कवा पान्यावरी उठतानं डोंगर लाटा..
3. जाती पान्यानं भिजून धर्ती..
विद्युत्पात- आकाशात चमकणारी आणि कडाडणारी वीज खरोखरीच वीज असते का? ती कशी निर्माण होते? वीज पडते म्हणजे नक्की काय होते? वीज पडताना कोणत्या क्रिया नेमक्या कोणत्या क्रमाने घडतात? हे जाणून घेण्यासाठी वाचा चार भागांची लेखमाला -
१. आभाळ वाजलं धडाऽडधूम
२. वारा सुटला सू सू सूऽम
३. वीज चमकली चक् चक् चक्
४. जिकडे तिकडे लख् लख् लख्
वातावरणातील अभिसरण- वातावरणातील अभिसरण हेच हवामानाचे कारक असते, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. हलणार्या हवेला वारा म्हणतात हे सामान्यज्ञान म्हणजे ही अभिसरण समजावून घेण्यातली पहिली पायरीच. वातावरणातील अभिसरण कसे होते? ते स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक श्रेणीमध्ये कशाप्रकारे कार्यरत असते? वातावरणातील अभिसरणाचे मानवाचे ज्ञान आजच्या स्थितीला येताना दरम्यान कोणकोणते महत्त्वाचे टप्पे पार पडले? कोणकोणत्या गणितज्ञ, भूगोलतज्ञ आणि शास्त्रज्ञांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा होता? हे समजावणारी सात भागांची लेखमालाः
१. प्रस्तावना
२. प्राचीन काळातील वाराविचार
३. मध्ययुगीन अभिसरणविचार
४. १५ वे ते १८ वे शतक
५. एकोणीसाव्या शतकातील प्रगती
६. विसाव्या शतकातील गरूडझेप – पूर्वार्ध
७. विसाव्या शतकातीक गरूडझेप – उत्तरार्ध
अनुदिनीतील महत्त्वपूर्ण दुवे
अक्र दुवा शीर्षक विषय
१ http://marathi.wunderground.com/US/AS/ वेदर अंडरग्राउंड मराठी हवामान
२ http://www.wmo.ch/ आंतर्राष्ट्रीय हवामान संस्था विशेषज्ञ संस्था
३ http://www.tropmet.res.in/ भारत उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था IITM
४ http://www.imd.ernet.in/ भारत मौसम विज्ञान विभाग IMD
५ http://www.noaa.gov/index.html राष्ट्रीय समुद्री व वातावरणीय व्यवस्थापन NOAA
६ http://khagras.wordpress.com/ विवस्वान सूर्य
अनुदिनी कशाकरता वाचनीय आहे?
“या गो दरियाचा दरारा मोठा... कवा पान्यावरी उठतानं डोंगर लाटा.. जाती पान्यानं भिजून धर्ती..” अशाप्रकारची चित्तवेधक शीर्षके घेऊन मनोगत डॉट कॉम वर त्सुनामीचे समयोचित वर्णन करतांना लेखिकेने विज्ञानाची गूढ तत्त्वे सामान्य जनांच्या परिभाषेत उलगडून दाखवलेली आहेत. तांत्रिक शब्द, परिभाषा निवडण्याची, त्यावर चर्चा घडवून आणण्याची आणि उचित विनिमयानंतर, योग्य मिमांसा करून तर्कशुद्ध पर्यायी मराठी शब्द घडवण्याची लेखिकेची जिज्ञासा आणि कुशलता कौतुकास्पद आहे.
साधी वीज पडते ती घटना. मात्र, “आभाळ वाजलं धडाऽडधूम... वारा सुटला सू सू सूऽम ... वीज चमकली चक् चक् चक् ... जिकडे तिकडे लख् लख् लख्” अशाप्रकारच्या शीर्षकांतून लिहिलेल्या विस्तृत चार लेखांद्वारे सौदामिनीचे सौंदर्य लेखिकेने ज्या नजाकतीने उलगडले आहे ते मुळातच वाचनीय आहे. त्याची उद्धृते इथे देऊन मी मजा किरकिरा करत नाही. पण सांगायचे एवढेच की हे सर्वच लेख मराठी विज्ञानाच्या इतिहासात अमिट छाप सोडतील ह्यात मला मुळीच शंका नाही.
लेखिका म्हणते, “वातावरणातील अभिसरण हेच हवामानकारक असते, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. हलणार्या हवेला वारा म्हणतात हे सामान्यज्ञान म्हणजे ही अभिसरण समजावून घेण्यातली पहिली पायरीच. वातावरणातील अभिसरण कसे होते? ते स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक श्रेणीमध्ये कशाप्रकारे कार्यरत असते? वातावरणातील अभिसरणाचे मानवाचे ज्ञान आजच्या स्थितीला येताना दरम्यान कोणकोणते महत्त्वाचे टप्पे पार पडले? कोणकोणत्या गणितज्ञ, भूगोलतज्ञ आणि शास्त्रज्ञांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा होता? हे जाणून घेण्यासाठी सात भागांची ’वातावरणातील अभिसरणा’ वरची लेखमाला वाचा.” मी ह्याचेशी १००% सहमत आहे.
ह्याशिवाय चंद्राचे महत्त्व, भूपट्ट विवर्तन इत्यादी महत्त्वाच्या विषयांवरले लेख आजच्या भूकंप-त्सुनामी इत्यादी नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर सुयोग्य लोकप्रबोधनाचे काम कुशलतेने करू शकतील. या सगळ्याकरता ही अनुदिनी अवश्य वाचावी अशीच आहे.
लवकरच सर्व वैज्ञानिक विषयांवरचे स्नातक, स्नातकोत्तर आणि वाचस्पती स्तरीय व त्यापश्चात संशोधनाचेही सर्व काम शुद्ध मराठीत चालावे अशी माझी इच्छा आहे. त्याकरता सुयोग्य पुस्तके हवीत. मात्र ती आज तरी, तशी उपलब्ध नाहीत. म्हणून आपण विज्ञान विषय मराठीत शिकू, शिकवू शकत नाही. अशी पुस्तके लिहिण्यास सक्षम, सत्पात्र, जाणकार लेखक हवेत. सदरहू लेखिकेस मी अशांतीलच एक गणतो. यासाठी ही अनुदिनी वाचनीय आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा