.
मला प्रमोद देव यांचा दूरध्वनी आला की उल्लेखनीय अनुदिन्यांत माझ्या अनुदिनीचाही समावेश आहे, तेव्हा खूप आनंद झाला. मग, आयोजकांचे पत्र वाचले. त्याचा मजकूर, त्वरित संदर्भाखातर खाली देत आहे.
प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धक,
‘स्टार माझा’चं स्लोगन आहे-‘नव्या मराठी माणसाचं, नवं न्यूज चॅनल’. जगभरात पसरलेल्या याच मराठी मंडळींसाठी आम्ही ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा सुरू केली. हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष. तुम्हीही भरभरून प्रतिसाद दिलात. यंदा तर कतार ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यू यॉर्क ते नागपूर इथून मराठी ब्लॉगर्सनी प्रवेशिका पाठवल्या. विषयाची रेंजही अशीच वैविध्यपूर्ण. महाभारत, भटकंती, खवैयेगिरी, वाचन, कविता, सामाजिक, राजकीय, आयटी....इ. आपले परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनीही उत्तम ब्लॉग निवडले. या दर्जेदार ब्लॉग्जची यादी आम्ही सहर्ष जाहीर करत आहोत. वस्तुत: तीन विजेते आणि दहा उत्तेजनार्थ ब्लॉगर्स जाहीर करण्याचं ठरलं असताना, इतके चांगले ब्लॉग्ज तुम्ही दिलेत की आम्ही सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स निवडले.
ज्यांचा समावेश या यादीत होऊ शकला नाही, त्यांचेही ब्लॉग्ज चांगलेच आहेत. पण, शेवटी परीक्षकांनाही निवडण्याची अवघड कामगिरी पार पाडायची असते. पुन्हा एकदा सर्व ब्लॉगर्सचे या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अभिनंदन, विजेत्यांचं कौतुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून अशाच प्रकारे मराठीचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यासाठी शुभेच्छा.....
विजेते ब्लॉग्ज
१. रोहन जगताप http://www.2know.in/
२. प्रभाकर फडणीस http://www.mymahabharat.blogspot.com/
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे http://www.sahajach.wordpress.com/
उत्तेजनार्थ ब्लॉग्ज
१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com/
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com/
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com/
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com/
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com/
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड http://www.shabd-pat.blogspot.com/
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com/
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com/
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com/
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com/
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com/
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com/
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com/
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com/
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com/
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/
--------------------------------------------------------------------------
मग अर्थातच, मला झालेला आनंद व्यक्त करण्याकरता आणि संबंधितांचे अभिनंदन करण्याकरता मी ही नोंद लिहायला घेतली.
मराठी साहित्यास अजिबात अनोळखी वाटणार्या, मात्र खर्याखुर्या जीवनातील अनुभवी, माहितगार आणि चोखंदळ मराठी रसिकांचे लेखन, जालनिशींच्या रूपात उदयमान होत आहे. त्यासोबतच या माध्यमावर प्रभुत्व असणार्या, त्या माध्यमातच व्यवसाय म्हणून पूर्णवेळ कार्यरत असणार्या मराठी सुहृदांनाही अभिव्यक्तीची ही अमोल संधी सहजच उपलब्ध झालेली आहे.
ज्या प्रमाणात हे नवनवोन्मेषशाली साहित्य निर्माण होते आहे त्याच्या आवाक्याची सर्वसामान्य पारंपारिक वाचकांस पुसटशीच कल्पना आहे. अशा साहित्यातील कस, वैविध्य आणि रंजन किती अपार आहे, हे जालावर अविरत वावरणार्यांना देखील पुरेसे ज्ञात नाही. मग सामान्य पारंपारिक (मुद्रित माध्यमांच्या) वाचकांस ते कसे आकळावे? ह्या अशक्यकोटीतील साध्यास गवसणी घालण्याचा, “स्टार माझा”ची ही स्पर्धा हा एक प्रभावी प्रयास आहे. त्याखातर त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! आपला हा प्रयास महाजालावरील मराठीच्या इतिहासात एक नवे पर्व उघडणार आहे.
मला जाणीव आहे की अशा साहित्यातील काही जालनिशांची निवड करून त्या लोकांपुढे अभिप्रायार्थ आणणे किती अवघड कामगिरी आहे. असंख्य स्पर्धक उमेदवारांच्या अनुदिन्यांचे परिपूर्ण वाचन करणेही केवळ अशक्यप्राय काम आहे. आपण वापरलेले निकष, परीक्षकसंख्या, वाचनाची खोली यांची मला कल्पना नाही. तरीही हजारोंच्या संख्येतील जालनिशांचे मंथन करून, जे नवनीत वर आणले आहेत त्याचा मी आदर करतो. ते नवनीत, जालनिशींच्या होतकरू वाचकांस सुरस वाटेल यात मुळीच संशय नाही. त्यामुळे पारंपारिक वाचकांसही जालावरील अपार नवसाहित्याचा शोध लागेल.
माझी अनुदिनी आपण उल्लेखनीय ठरवलीत ह्याखातर आपणांस हार्दिक धन्यवाद! इतर सर्व उल्लेखनीय ठरलेल्या उमेदवार-अनुदिन्यांच्या लेखकांचेही हार्दिक अभिनंदन. सर्व सहभागी अनुदिनीलेखकांचेही सहर्ष कौतुक. कारण आपण सर्वच, या नव्या युगातील अनुभवलेखनाचे आधारस्तंभ आहात!
या प्रयासात सहभाग न घेतलेल्याही असंख्य मराठी अनुदिन्या, जीवनाच्या अगणित पैलूंवर दररोज अपार लेखन प्रकाशित करत आहेत. त्याही वाचून, आपापले नीरक्षीरविवेक जागृत करावे, क्षीरसंचय करून आपापले जीवन समृद्ध करावे, अशी उमेद पारंपारिक वाचकांस निर्माण झाली तर हा प्रयास खरोखर सार्थ ठरेल.
.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
१३ टिप्पण्या:
नरेंद्रकाका, बक्षिसाबद्दल हार्दिक अभिनंदन!!! असेच लिहत रहावे. मी आपला ब्लॉग नेहमीच वाचत आलोय, प्रतिक्रिया दिल्या नसाव्यात कदाचित,कारण ते 'word verification', कंटाळा येतो! :D आज मात्र आवर्जून लिहीतोय. आपण छानच लिहीता. पुन्हा एकदा अभिनंदन!
First of all congrats for winnig Star majha Blog Compition...
Tumacha blog agadi sutsutit aani bharpur mahitipurn wa wachaniy mhanata yeil asa aahe..
Shubhecha
http://ransangram.blogspot.com
अभिनंदन!
असेच लिहत रहा.
विजेत्या ब्लाँगबद्द्ल आपले
अभिनदंन !! अभिनदंन !!
विजेत्या ब्लाँगबद्द्ल आपले
अभिनदंन !! अभिनदंन !!
Abhinandan... :-)
गोळेकाका....मनापासून अभिनंदन :)
स्पर्धेतील यशासाठी खूप खूप अभिनंदन... :)
खूप खूप अभिनंदन.
Congratulations.
आपण दुसर्या विजेत्यांचे ब्लोग वाचता का ?
आणी वाचत आसाल तर रोखठोक प्रतिक्रिया देता का ?
संकेत, स्वप्निल, सलील, विवेक, मैथिली, जयश्री, रोहन, गंगाधर, मीनल, आणि सुखदेव तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
सुखदेव, हो. मी सर्व विजेत्यांचे ब्लॉग, किमान अंशतः तरी वाचलेले आहेत. अनेक ठिकाणी, जिथे प्रतिसाद द्यावेसे वाटलेत तिथे तिथे लिहीलेही आहेत. रोखठोक आहेत की नाहीत ते तुम्हीच सांगा वाचून! हे आणि इतरही अनेक ब्लॉग मी वाचतो. वाचलेले आहेत.
मात्र, तुमच्या चौकशीचा उद्देश तसा असल्यास, इथे हे कबूल करावेच लागेल की सर्वच साहित्य सर्वांनीच वाचलेले असेल, असे असणे केवळ अशक्य कोटीतील आहे.
सरळ सरळ बोलतॊ. माझ्या बोलण्याचा रोख हा होता की विजेत्यांच्याकडे इतर विजेत्यांच्या ब्लोग वरील काही अनुचित लिखाणाबाबत बोलण्याचे धारिष्ट् आहे का. कारण श्री. एम. डी. रामटेके यांनी खुपच गरळ ओकणारे लिखाण केले आहे. काही ठिकाणी तर त्यांनी स्वामी विवेकानंदांचा येकेरी उल्लेख केला आहॆ. अश्या ब्लोग्जना उत्तेजन देउन परिक्षकांनी काय साध्य केले? त्यांनी तरी ब्लोग्ज संपुर्ण वाचला आहे का? त्यांनी चक्क 'नकली टिळक' असे म्हटले आहे. समाज विघातक लिखाण आहे हे. मला यावर समस्त विजेत्यांची प्रतिक्रिया ऎकायला आवडेल..
टिप्पणी पोस्ट करा