२००९-०५-२३

मार्ग

'गल्ली' ला असती दोन्ही दिशांना दारे । 'बोळा' स परंतु एक दिशाच खुली रे ॥
मळलेली असते 'पाऊलवाट' जुनी रे । हे शब्द सुचविती 'मार्ग' मराठीत सारे ॥१॥

'वाटे' वर असती काटे नित्य स्मरा रे । ती 'सडक' कडक जरी धुंडित गाव पुढारे ॥
'रस्त्या' स दुतर्फा 'पदपथ' रक्षित बा रे। हे शब्द सुचविती 'मार्ग' मराठीत सारे ॥२॥

समस्येचे करिती 'समाधान' जन सारे । प्रश्नाला शोधिती 'उत्तर' कुठेही बा रे ॥
उत्तरा दिसती जे 'पर्याय' पहा सारे । हे शब्द सुचविती 'मार्ग' मराठीत सारे ॥३॥

कुणी धर्म पूजती कुणास 'पंथ' हवा रे । तुम्ही संकटात, सत्याचा 'पक्ष' धरा रे ॥
अन् नाम जपा जर 'उपाय' थकले सारे। हे शब्द सुचविती 'मार्ग' मराठीत सारे ॥४॥

- नरेंद्र गोळे २००४०८२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: