20190516

तात्या अभ्यंकरांना सद्गती लाभो!
मनोगत डॉट कॉमवर आंतरजालीय, अनिर्बंध सत्वर प्रतिसाद चर्चा, देवनागरीत प्रथमच शक्य झाली होती. त्याचा आनंद आम्ही सारेच घेत होतो. क्वचित स्वातंत्र्याचा गैरवापरही व्यक्तिगत टीकेकरता होऊ लागला. मग तेथील प्रशासक श्री. महेश वेलणकर ह्यांनी प्रत्येक नोंदीवर प्रकाशनपूर्व निर्बंध घातले. त्याचा निषेध करण्यासाठी मग मनोगत कट्टा झाला. आयोजकांत एक होते तात्या. मी त्यांना म्हटले की प्रशासकांवर टीका करण्यापेक्षा ’मनोगता’ला उत्तर देण्याकरता तुम्ही ’जनोगत’ काढा आणि चालवून दाखवा ना! त्याला तात्यांनी मिसळपाव डॉट कॉम काढून उत्तर दिले. त्या सर्व जालसंजीवित आठवणींचा गुच्छच ह्या फोटोत दडलेला आहे. मात्र तात्या आज नाहीत. काल होते. आज नाहीत. तात्यांना ईश्वर सद्गती देवो.


उभेः डॉ. विलास (नामी_विलास), डॉ. मिलिंद फणसे, श्री. चित्तरंजन सुरेश भट (चित्त), श्री. माधव कुलकर्णी, श्री. आल्हाद महाबळ (भारत मुंबईकर), श्री. जयंत कुलकर्णी (जयन्ता-५२), डॉ. सुबोध जावडेकर, श्री. चक्रपाणी चिटणीस, श्रीमती अभ्यंकर, श्री. अभ्यंकर

खुर्चीवरः श्री. बळवंतराव पटवर्धन (सर्वसाक्षी), श्रीमती छाया राजे, अज्ञात-१, श्री. नरेंद्र गोळे, अज्ञात-२, श्री. आनंद घारे (आनंदघन), श्री. दि. गं. भागवत

जमिनीवरः श्री. प्रमोद देव (अत्यानंद), डॉ. कुमार जावडेकर, अज्ञात-३, श्री. चंद्रशेखर अभ्यंकर (तात्या अभ्यंकर, विसोबा खेचर), श्री. अनिरुद्ध अभ्यंकर (केशवसुमार), श्री. आनंद पेंढारकर, श्री शंतनू ओक

जाणकारांनी ह्या माहितीत अवश्य भर घालावी!


No comments: