20090512

वर्तमान !

हे वर्तमान तुजला संबोधत आहे ।
हे वर्तमान तुजला विनवित आहे ॥
स्थिति वर्तमान सगळी उमजून घ्याया ।
नव वर्तमान तुजसी कळवित आहे ॥ १ ॥

तू का उगाच स्मरसी, भूतातल्या कथांना ।
भूता भविष्य मुळी ना, समजत तुला नसे का ॥
तुझी वर्तमान करणी, घडते तुझ्या उद्याला ।
जग वर्तमान स्थिती तू, घडवी नव्या युगाला ॥ २॥

नरेंद्र गोळे २००६०२०५

No comments: