20090802

चित्रकविता-५

उदकांजली मधुनी |
पानेच अर्घ्य देती ||
पानेच दान घेती |
त्या सरस जीवनाचे ||

ओजस्वी बिंदू बिंदू |
हातात राहती ना ||
अर्घ्यातुनी सुटूनी |
ते मिळवती प्रवाहा ||

ही देवघेव सारी |
दीप्ती सदैव पाहे ||
तो आसमंत सारा |
मग दीप्तीमान राहे ||

प्रकाशचित्रः दीपा लोलयेकर
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०३१९

1 comment:

मोगरा फुलला said...

आपल्या परिचयाच्या अनुदिनींमधे माझ्याही अनुदिनीचे नाव समाविष्ट केल्याबद्दल मनापसून धन्यवाद!