माझे अधोभारणीय लेखन

▼

२००९-०८-०२

चित्रकविता-५

उदकांजली मधुनी |
पानेच अर्घ्य देती ||
पानेच दान घेती |
त्या सरस जीवनाचे ||

ओजस्वी बिंदू बिंदू |
हातात राहती ना ||
अर्घ्यातुनी सुटूनी |
ते मिळवती प्रवाहा ||

ही देवघेव सारी |
दीप्ती सदैव पाहे ||
तो आसमंत सारा |
मग दीप्तीमान राहे ||

प्रकाशचित्रः दीपा लोलयेकर
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०३१९

1 टिप्पणी:

  1. आपल्या परिचयाच्या अनुदिनींमधे माझ्याही अनुदिनीचे नाव समाविष्ट केल्याबद्दल मनापसून धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४