माझे अधोभारणीय लेखन

▼

२००९-०८-१५

दिनेर आलो निभे एलो

 "दिनेर आलो निभे एलो" या रबिंद्रनाथ ठाकूर यांच्या मूळ बंगाली गीताचा मराठी अनुवाद


"दिवस आला मावळतीला"


दिवस आला मावळतीला, सूर्य बुडे बुडे
आकाशी येती मेघ भरून, चंद्रम्याच्या लोभे

मेघावरी मेघ भरे, रंगावरी रंग
मंदिरातील कांस्य घंटा, वाजते ढंग ढंग

वादळी हवेत मला स्मरे, लहानपणीचे गान
पाऊस पडे टापूर टुपूर, नदीला ये उधाण


मूळ बंगाली गीतः

दिनेर आलो निभे एलो


दिनेर आलो निभे एलो, सुज्जी डुबे डुबे
आकाश घिरे, मेघ जुटेछे, चाँदेर लोभे लोभे

मेघेर उपर मेघ करेछे, रंगेर उपर रंग
मंदिरेते काँसर घंटा, बाजलो ढंग ढंग

बादल हावाय मने पडे, छेले बेलार गान
वृष्टी पडे टापूर टुपूर, नदे एलो बान


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११०५

२ टिप्पण्या:

  1. तुमची अनुदिनी आवडली. "वैतालिक" ह्या संस्थेतर्फे रवींद्रनाथांच्या काही प्रेमकवितांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला होता. त्यात इंग्रजी अनुवादासोबत मूळ बंगाली कविता देवनागरीत दिलेल्या असल्याने मलाही त्यातील दोन कवितांचा अनुवाद करण्याचा मोह झालेला होता. तुमच्या ह्या अनुवादाइतका मला तो साधलेला नव्हता पण स्मृती चाळवल्या गेल्या आणि तुम्हाला हे सांगावेसे वाटले. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद रामचंद्रजी! तुम्ही केलेला अनुवादही वाचायला आवडेल. उपलब्ध होऊ शकेल का?

    उत्तर द्याहटवा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४