सोडा धर्म नसाल
मुस्लिम तरी, मुस्लीम व्हा या इथे
जा सांगा घडले जसे
तसतसे, मोदीस हे ऐकवा ।
ऐसे बोलुन मारले
धडधडा, सव्वीस निःशस्त्र ते
भीतीने भरला पुरा
मुलुख तो, वर्चस्व आवाहिले ॥
मोदींनी सगळा प्रकार
तिथला, निर्भत्सिला पूर्ण तो
देऊ त्यां असला धडा खचितची,
त्यांनी नसे कल्पिला ।
पुन्हा कोणि न साहसा
करु शको, या भारता त्रासते
केली सर्वच योजना, दहशती
ढाचाच तो ध्वंसण्या ॥
एके रात्रि नऊ स्थळी
धडकली, अस्त्रेच सीमेतुनी
ध्वंसीली सगळी स्थळे
दहशती, पूरा कणा मोडला ।
पाकीस्तान तयास मानुन
खरा, हल्लाच भूमीवरी
शस्त्रास्त्रे परजून
सर्व लढला, या भारती भूमिशी ॥
त्याचे एकहि अस्त्र
येउ न दिले, सारीच ती ध्वंसिली
ही सारी किमया असे उमजत्या,
संवेदि तंत्रांचि ती ।
देता तो प्रतिसाद
त्यास असला, सेनाहि ती धावली
बारा वायुतळे निखंदलि
पुरी, आकाश संरक्षिले ॥
त्या कार्या मिनिटांत
तेविस दिली सिद्धी, जगा दाविले ।
जाई तोच लयास जो
गणतसे, मा भारतीला उणे ॥
नरेंद्र गोळे
२०२६०५०७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४