'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना!
काय नुसते वाचता प्रतिसाद द्याहातची राखून द्या पण दाद द्याआंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्हीअन् मुक्यांना नेमके संवाद द्याजीव कासावीस झाला आमुचामूळचे नाही तरी अनुवाद द्याकालची आश्वासने गेली कुठे? ते पुन्हा येतील त्यांना याद द्यावेगळे काही कशाला ऐकवा?त्याच त्या कविताच सालाबाद द्याएवढा बहिरेपणा नाही बरा, हाक कोणीही दिली तर साद द्यागोरगरिबांना कशाला भाकरी? गोरगरिबांना अता उन्माद द्याव्हायचे सैतान हे डोके रिते,त्यास काही छंद लावा नाद द्या- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४