२०१२-१०-२२

ब्लॉग माझा स्पर्धा- २०१२: निकाल जाहीर

एबीपी माझाच्याब्लॉग माझा स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी ब्लॉग माझा ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ब्लॉग माझा’! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे परिक्षक असणारे दै. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर दीडशेहून अधिक आलेल्या ब्लॉग्जमधून फक्त पंधरा ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं. हीच निवड ह्या निकालाद्वारे व्यक्त होत आहे. 

(प्रथम पसंतीचे पाच ब्लॉग्ज आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉग्ज हे दोनच गट आहेत. या गटातील क्रमवारी म्हणजे गुणानुक्रम नाही.)

प्रथम पसंतीचे पाच ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग


अक्र
अनुदिनी
अनुदिनी लेखक/लेखिका



सुलक्षणा लक्ष्मण
सागर पाटील
नरेंद्र गोळे
विद्या कुलकर्णी
युवराज गुर्जर



उत्तेजनार्थ निवडलेले दहा ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग

अक्र
अनुदिनी
अनुदिनी लेखक/लेखिका



अवधूत
गंगाधर मुटे
प्रशांत रोटवदकर
तन्मय कानिटकर
रोहन जगताप
प्रसाद इनामदार
ब्रिजेश मराठे
एकनाथ मराठे
श्रेया महाजन
१०
विजय लाले

नुकताच श्री.प्रसन्न जोशी, ए.बी.पी.माझा ह्यांनी ई-मेलद्वारे वरील निकाल कळविलेला आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

ए.बी.पी. माझाच्या संकेतस्थळावरील निकालाची घोषणा

श्री.प्रसन्न जोशी आणि ए.बी.पी.माझा वाहिनी ह्यांना माझे हार्दिक धन्यवाद!
मराठीत अनुदिनीलेखनास प्रोत्साहन देण्याचे काम ते गेल्या चार वर्षांपासून करत आहेत. त्यामुळे महाजालीय मराठी साहित्य लेखकांना, मुद्रित माध्यमांतील लेखनाच्या तोडीस तोड ठरेल असे साहित्य निर्माण करण्याची उमेद निर्माण होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे!

१६ टिप्पण्या:

प्रशांत दा.रेडकर म्हणाले...

नरेंद्रजी तुमचे अभिनंदन!

या स्पर्धे बाबत बोलायचे झाले तर, मला या स्पर्धेचा निकाल बुचकळ्यात टाकणारा वाटला.
मला जे आक्षेपार्ह वाटले ते इथे नमूद करतो.
१)मृगतृष्णा हा सुलक्षणा लक्ष्मण यांचा पहिल्या क्रमांकाचा ब्लॉग पाहिला..त्यात कुतुहल म्हणून चीन विभागवर टिचकी दिली...त्यात Aftershock full movie (english subtitles) नावाचा चीनी चित्रपट सापडला.आणि काही चीनी टीव्ही सिरिअल्स.. १००% पायारसी झाली आहे.म्हणजे आपल्या देशात केली तर पायारसी आणि दुस-या देशातना ढापले की त्याला काय म्हणायचे?

२)एका स्पर्धकाला स्वत:चा एक ब्लॉग पाठवता येईल असा नियम असताना ..विद्या कुलकर्णी यांच्या इंद्रधनू ६ जणीनी मिळून लिहिलेल्या ब्लॉगची निवड होतेच कशी?
सर्वच गोंधळात टाकणारे आहे.

भानस म्हणाले...

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!

aativas म्हणाले...

अभिनंदन!

अमोल केळकर म्हणाले...

विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन

नरेंद्र गोळे म्हणाले...

प्रशांत,
तुम्ही म्हणता ते खरे आहे. मात्र पुरस्कार देणार्‍याने काय निकष लावावेत हे आपण कसे सांगणार?
तरीही पारदर्शकता दाखवली असती तर चांगले झाले असते असे वाटते! शुभेच्छांखातर मनःपूर्वक धन्यवाद!


भानस, आतिवास आणि अमोल केळकर शुभेच्छांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

अनामित म्हणाले...

प्रिय नरेंद्रजी,
अभिनंदन !
मंगेश नाबर.

Aditya Patil म्हणाले...

अभिनंदन! विविध विषयांवरील आपले वैचारिक लिखाण मनाला समाधान देवून जाते

ऊर्जस्वल म्हणाले...

धन्यवाद आदित्य. कुणाला तरी लिहिलेले आवडते आहे ह्याचा लिहिणार्‍याला नक्कीच आनंद होत असतो. मला हा आनंद दिल्याखातर पुन्हा एकदा धन्यवाद.

अनामित म्हणाले...

गोळेकाका........ मनापासून अभिनंदन :)
दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवलात त्यामुळे दुहेरी अभिनंदन :)

जयश्री अंबासकर म्हणाले...

गोळेकाका ........मनापासून अभिनंदन :)
दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवलात त्यामुळे दुहेरी अभिनंदन :)

Global Desi . म्हणाले...

Congrates Mr . Gole . You are a senior winner . All the best .

Unknown म्हणाले...

अभिनंदन!

विजय शेंडगे म्हणाले...

नरेंद्र जी
एबीपी माझा : ब्लॉग माझा स्पर्धा.पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिंनदन.

नरेंद्र गोळे म्हणाले...

जयश्री, सुलक्षणा, मृदुला आणि विजय,

आपल्या शुभेच्छांचा मी सहर्ष स्वीकार करतो.

वाचकांना माझे लेखन असेच आवडत राहो हीच यानिमित्ताने सदिच्छा!

Gangadhar Mute म्हणाले...

दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवलात त्यामुळे दुहेरी अभिनंदन...!

मुंबईला भेटूच. :)

Mantri म्हणाले...

अभिनंदन व उत्कृठ लिखाणाबद्दल अनेक शुभेछा.