20110404

गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपणा सर्वांस नवे "खर नाम संवत्सर" उत्तम आयुरारोग्य आणि सुखसमाधान देवो!

डोंबिवली शहराने, नववर्षाची पहाट नव्या उत्साहाने, प्रभातफेरी काढून, रस्ते स्वच्छ करून साजरी करण्याची प्रथा पुनरुज्जीवित केली. त्याच नववर्ष स्वागत यात्रेतील ही काही परिदृश्ये!या म्हणताहेत की सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणजे "गुढीपाडवा", व म्हणून हाच हिंदूंचा वर्षारंभदिन आहे.

हिंदू संस्कृती जोपासा! वाढदिवस केवळ केक कापून नव्हे तर तिथीनुसार औक्षण करून साजरा करा! असेही म्हणणारा एक फलक दिसून येतो.

शिक्षणानेच देश घडतो. म्हणून शिक्षणाचा प्रसार करा सांगणारेही मिरवणुकीत सहभागी होते.

सर्व समाजांच्या, सर्व थरांतील लोक उत्साहाने सहभागी झालेले दिसून आले.


यावेळचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे जाणीवपूर्वक टाळलेले फटाक्यांचे प्रदूषण आणि विजेवर चालणार्‍या स्वयंचलित वाद्यांचे दूर ठेवले जाणे. लेझिम, ढोल, ताशा, झांझा, टाळ या पारंपारिक वाद्यांवर सुरेख लयबद्ध नृत्य करत पथ आक्रमणारी मिरवणूक नेत्रसुखद होती. गुलाल, बुक्का, भंडारा इत्यादी रंगद्रव्यांचा वापरही मर्यादित राखल्याने उत्साहास गालबोट लागले नाही.

सचिन-धोनीच्या संघाने दैदिप्यमान सांघिक खेळी करून भारतास क्रिकेटचा "विश्व-कप" मिळवून दिल्याची स्मृतीही रस्त्यावर ताजीच दिसत होती!

अशाच विजयी पताकांनी नवे वर्ष सुखसमाधान आणि भरभराट घेऊन येवो हीच प्रार्थना!

No comments: