20091204

असामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे



हे रेखाचित्र,

डॉ. होर्मसजी जहांगीर भाभा
ह्या प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञांनी काढलेले

श्रीमान मक्बूल फिदा हुसेन यांचे रेखाचित्र आहे.

आपण हुसेन ह्यांना ओळखतच असाल!
ते जगप्रसिद्ध चित्रकार आहेत.

आणि हो. ज्यांनी माधुरी दीक्षितवर "गजगामिनी" सिनेमा काढला,
तेच ते थोर चित्रकार.








हे रेखाटन सुधीर फडकें (बाबुजीं) चे असून

त्यांच्या सौभाग्यवती ललिताबाई, यांनी काढलेले आहे.

स्त्रोत: सुधीर फडकेंचे चरीत्र 'जगाच्या पाठीवर'.

ललिताजी चित्रकार तर होत्याच
पण उत्तम भावगीत-गायीकाही होत्या.








हे रेखाचित्र
व्यंकटेश माडगुळकरांनी काढलेले,

गदिमांचे रेखाचित्र आहे.

व्यंकटेश माडगुळकर हे

त्यांच्या "बनगरवाडी" साठी
आणि शिकारकथांसाठी प्रसिध आहेत.












.

उपसर्ग

उपसर्गानी शब्दाचा अर्थ तो बदलतो पुरा ।
प्रहाराहारविहार संहारापरी तो स्मरा ॥ धृ ॥

'प्रहार' करतो वार, 'आहार' भूक भागवी ।
'विहार' घडवी संचार, 'संहार' नाहीसे करी ॥ १ ॥

कार, कार्य, काज, काम उपसर्गे त्रस्त सर्वही ।
एकेकाची गती पाहू, अर्थ ते बदलती कसे ॥ २ ॥

'सत्कार' करी सन्मान, 'बेकारा' तो न लाभतो ।
'आकार' घडवितो दर्शन, 'प्रकार' वेगवेगळे ॥ ३ ॥

'सत्कार्य' चांगले म्हणती, 'दुष्कार्या' म्हणती वाईट ।
'कार्य' कार्यालयी होते, 'मत्कार्य' माझे असे ॥ ४ ॥

'कामकाज' होत सर्वत्र, 'काजं' गुंडीसवे रत ।
'कृषीकाज' पिकविते अन्न, 'वैश्यकाज' देतघेत ते ॥ ५ ॥

'काम' मोहास कारण हो, 'निष्काम' म्हणुनी असा ।
'नाकाम' स्फोटही होती, 'घरकाम' भासते कठीण ॥ ६ ॥

नरेंद्र गोळे २००६११२३.