20090815

"दिनेर आलो निभे एलो" या रबिंद्रनाथ ठाकूर यांच्या मूळ बंगाली गीताचा मराठी अनुवाद


"दिवस आला मावळतीला"


दिवस आला मावळतीला, सूर्य बुडे बुडे
आकाशी येती मेघ भरून, चंद्रम्याच्या लोभे

मेघावरी मेघ भरे, रंगावरी रंग
मंदिरातील कांस्य घंटा, वाजते ढंग ढंग

वादळी हवेत मला स्मरे, लहानपणीचे गान
पाऊस पडे टापूर टुपूर, नदीला ये उधाण


मूळ बंगाली गीतः

दिनेर आलो निभे एलो


दिनेर आलो निभे एलो, सुज्जी डुबे डुबे
आकाश घिरे, मेघ जुटेछे, चाँदेर लोभे लोभे

मेघेर उपर मेघ करेछे, रंगेर उपर रंग
मंदिरेते काँसर घंटा, बाजलो ढंग ढंग

बादल हावाय मने पडे, छेले बेलार गान
वृष्टी पडे टापूर टुपूर, नदे एलो बान


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११०५

2 comments:

P A Ramchandra said...

तुमची अनुदिनी आवडली. "वैतालिक" ह्या संस्थेतर्फे रवींद्रनाथांच्या काही प्रेमकवितांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला होता. त्यात इंग्रजी अनुवादासोबत मूळ बंगाली कविता देवनागरीत दिलेल्या असल्याने मलाही त्यातील दोन कवितांचा अनुवाद करण्याचा मोह झालेला होता. तुमच्या ह्या अनुवादाइतका मला तो साधलेला नव्हता पण स्मृती चाळवल्या गेल्या आणि तुम्हाला हे सांगावेसे वाटले. धन्यवाद.

नरेंद्र गोळे said...

धन्यवाद रामचंद्रजी! तुम्ही केलेला अनुवादही वाचायला आवडेल. उपलब्ध होऊ शकेल का?