२००७-१०-१८

स्फूर्ती देवीची आरती

दिव्य मी देत ही दृष्टी, सृष्टीला ह्यातुनी पहा ॥
वर्तनी ऋजुता राखा, निष्कोप वृत्ति राहू द्या
 ॥

स्फूर्ती देवीची आरती

स्फूर्ते अवघड भारी, तुजविण संसारी ।
अज्ञानी वत्सांच्या, ज्ञाना विस्तारी ॥
वारी वारी मजला, अकर्मण्याद्वारी ।
कृतीच्या स्फूर्ती ने, आम्हा निवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी, जय स्फूर्ती देवी ।
निष्चळ मन हो सत्वर, वर दे संजीवनी ॥ धृ ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता, तुलना तुज नाही ।
तव किमयेचे कौतुक, कळते लवलाही ॥
अगणित मनुजा प्रेरक, कमालीची ठरशी ।
ती शक्ती तू मज दे, गाईन तव कीर्ती ॥ २ ॥

उत्स्फूर्त वदने स्फूर्ती, देशी निजदासा ।
आळसापासुनी सोडवी, वाढवी जीवनाशा ॥
स्फूर्ते तुज वाचून, कोण वाढवी यशा ।
'नरेंद्र' तल्लीन झाला, तव धरी जिज्ञासा ॥ ३ ॥

नरेंद्र गोळे २००४१०२०

1 टिप्पणी:

Meenal Gadre. म्हणाले...

मला आवडली स्फूर्तीदेवीची आरती.
मला तर फारच जरूर आहे...
आळसापासुनी सोडवायला आणि जीवनाशा वाढवायला.